पायांच्या भेगांवर कोकम तेल लावा (Treat Your Fee...

पायांच्या भेगांवर कोकम तेल लावा (Treat Your Feet With Kokum Oil To Heal Cracks)

मी एक 37 वर्षीय विवाहित स्त्री आहे. माझ्या पायांना भेगा पडतात. त्यामुळे टाचांमधून रक्तही येतं. त्यामुळे पायाला जरा काही लागलं तरी सहन होत नाही. यावर काही घरगुती उपचार सुचवाल का?

 • रश्मी, धुळे.
  थंडीच्या वातावरणात पायांची निगा राखणं खूप गरजेचं असतं. सर्वात आधी पाय स्वच्छ गरम पाण्याने धुवा. पायांना मोकळे सोडू नका. सतत घरात देखील पायात मोजे घाला. रात्री झोपण्याआधी कोकम तेल गरम करून पायांना लावा. बाहेर जाणार असलात तर टाचा झाकून जातील अशा फुटवेअर्सचा वापर करा. एखादं केळं एका बाऊलमध्ये व्यवस्थित स्मॅश करून घ्या अन् ती पेस्ट पायांच्या भेगांवर लावा. त्या पेस्टमध्ये तुम्ही थोडं गुलाबपाणी एकत्र करून लावा. नक्कीच फरक जाणवेल.
 • मी एक 45 वर्षीय महिला आहे. माझ्या केसामध्ये प्रचंड कोंडा होतो आहे. अतिशय चांगल्या कंपनीचे शाम्पूचे प्रोडक्ट वापरून झाले, तरी काहीच फरक पडला नाही. कृपया केसातील कोंड्यावर परिणामकारक उपाय सुचवा?
 • सुषमा, मुंबई
  सर्व प्रथम तुम्ही केसातील कोंडा जाण्यासाठी तेलाची मालिश सुरू करा. ज्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस, 5 चमचे नारळाच्या तेलात मिक्स करून त्या तेलाने मालिश करा. तसेच कोरफडीच्या रसाने केसांना मसाज करा आणि एक तासाने केस धुवा. नारळाच्या तेलात कापूर मिसळून ठेवा. केस धुण्याआधी या तेलाने मसाज करा. नियमित हे केल्याने कोंड्याची समस्या दूर होईल, यामध्ये काही शंका नाही.
 • मी एक 38 वर्षीय गृहिणी आहे. माझी हाताची नखं अगदी थोडी जरी वाढवली तरी ती तुटतात. मी माझ्या नखांना कोणताही शेप देऊ शकत नाही. असं का होतं आणि यावर उपाय काय करायचा?
 • दीपा, कोल्हापूर
  आपण आपल्या व्यक्तीमत्त्वाबद्दल किती दक्ष असतो. आपली वेशभुषा, केशरचना, प्रसाधन हे सगळं आपण अतिशय काळजीपूर्वक निवडत असतो. आपल्या हातापायांची नखे सुंदर असावीत असे सगळयांनाच वाटते. सतत तुटणारी, रुक्ष झालेली नखे सगळ्यांनाच त्रासाची वाटतात. म्हणून नखांना नियमितपणे बदामाचे तेल लावल्यास नखांचा रुक्षपणा दूर होतो. तसेच रात्री झोपण्याआधी नखांना एखाद्या चांगल्या मॉइश्चराजरने मसाज करा. त्यामुळे नखे निरोगी आणि चमकदार राहतील.