‘भाऊबळी’ या नव्या विनोदी चित्रपटाचे...

‘भाऊबळी’ या नव्या विनोदी चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित (Trailer Of New Comedy Film ‘Bhaubali’ Released : Manoj Joshi Heads The Cast)

झी स्टुडिओजने नेहमीच प्रेक्षकांना खूप उत्कृष्ट सिनेमे दिले. ‘पांडू’, ‘टाईमपास ३’, ‘धर्मवीर’ सारखे सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर झी स्टुडिओज आता विनोदी सिनेमा घेऊन येत आहेत.

झी स्टुडिओज प्रस्तुत, समीर पाटील दिग्दर्शित ‘भाऊबळी’ हा विनोदी  चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे निर्माते नितीन वैद्य, निनाद वैद्य, अपर्णा पाडगावकर आहेत. या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले असून मनोज जोशी, किशोर कदम, मेधा मांजरेकर, ऋषिकेश जोशी, संतोष पवार आणि अनेक कमाल कलाकार या सिनेमाला लाभले आहेत. हा चित्रपट हास्याची कोणती विनोदी खेळी रंगवणार ते सिनेमा पाहिल्यावरच कळेल. 

दिवंगत ज्येष्ठ नाटककार, पत्रकार आणि लेखक जयंत पवार यांनी लिहिलेला हा शेवटचा सिनेमा आहे. विनोदी तरी मोलाची शिकवण देऊन जाणारा हा सिनेमा असणार असं एकंदर चित्र ट्रेलर पाहून समजते. येत्या १६ सप्टेंबरला मनोरंजन डबल करायला ‘भाऊबळी’ सिनेमागृहात येत असून ट्रेलर पाहून सिनेमा पाहण्यासाठीची प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढलेली दिसत आहे.

दिग्दर्शक समीर पाटील चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल म्हणतात,”झी स्टुडिओजने नेहमीच भव्य दिव्य एकापेक्षा एक सिनेमे दिले आहेत. झी स्टुडिओज ‘भाऊबळी’ सिनेमा मोठ्या प्रमाणात सर्वत्र प्रदर्शित करेल याची मला खात्री आहे. सर्वच उत्तम कलाकार या सिनेमाला लाभले आहेत. या सिनेमाला सुद्धा प्रेक्षक भरभरून प्रेम देतील अशी मला आशा आहे.”