आलिया व रणबीरचा बहुप्रतिक्षित ब्रम्हास्त्र चित्...

आलिया व रणबीरचा बहुप्रतिक्षित ब्रम्हास्त्र चित्रपटाचा ट्रेलर रिलीज (Trailer Of ‘Brahmastra’ Released: Starring Ranbir Kapoor And Alia Bhatt)

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया हे दोघे लवकरच ब्रम्हास्त्र या चित्रपटात एकत्र दिसतील. आज 15 जूनला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या ट्रेलरमध्ये रणबीर आणि आलिया वाईट शक्तींशी लढताना दिसतात. या चित्रपटात रणबीर आणि आलियासोबत अमिताभ बच्चन, नागार्जुन , मौनी रॉय यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत.

अभिनेत्री आलिया भट्टने सोशल मीडियावर ब्रम्हास्त्रचा ट्रेलर शेअर करत म्हटले की, आमच्या काळजाचा एक तुकडा-ब्रम्हास्त्र. भेटूया 9 सप्टेंबरला.

ब्रम्हास्त्र चित्रपटाची कथा शिवा (रणबीर कपूर) नावाच्या मुलाभोवती फिरते. या मुलाकडे काही शक्ती असतात पण तो त्या शक्तींबाबत अनभिज्ञ असतो. या चित्रपटात शिवा आणि अग्नीचे खास नाते असते. आग शिवाजवळ गेली तरी त्याला काहीच होत नाही किंवा त्याला भाजत सुद्धा नाही. शिवा आणि इशा ( आलिया भट्ट) यांच्या प्रेमकहाणी दरम्यान त्याला त्याच्यात असलेल्या शक्तींची जाणीव होते. अमिताभ बच्चन आणि नागार्जून या ब्रम्हांडाचे रक्षणकर्ते दाखवण्यात आले आहेत. तर अभिनेत्री मौनी रॉय या चित्रपटाची खलनायिका दाखवण्यात आली आहे.

सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये सर्व पात्रांची ओळख करुन दिली आहे. ब्रम्हास्त्र पार्ट 1 शिवा हा चित्रपट अयान मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला असून हा तीन भागांचा चित्रपट असेल. याचा पहिला भाग 9 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. स्टार स्टुडिओ, धर्मा प्रोडक्शन, प्राइम फोकस आणि स्टारलाईट पिक्चर्स निर्मित हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या 5 भाषांमध्ये रिलीज होणार आहे.