तोंड कडू करणाऱ्या साखरेची हृदयद्रावक कथा (Tragi...

तोंड कडू करणाऱ्या साखरेची हृदयद्रावक कथा (Tragic Tale Of Sugarcane Workers : Exploitation Of Woman)

पणजी येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेल्या ‘बिटरस्वीट’ या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांना अंतर्मुख केले.
सगुणा आणि तिच्या सहकारी ऊसतोडणी ऊस तोडणी मजुरांच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या कष्टांची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे.

ऊस तोडणीच्या काळात बीड जिल्ह्यातील महिला मजुरांना एक दिवसही सुटटी घेणे परवडत नाही. मासिक पाळी येते तेव्हा ३-४ दिवस कामावर जात येत नाही व मजुरी मिळत नाही. हे नुकसान टाळण्यासाठी या गावात सुमारे १० वर्षांपूर्वी एक विचित्रप्रथा सुरु करण्यात आली. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या भागांतून स्थलांतरित झालेले भोंदू आणि पात्रता नसलेले बीडमध्ये आले आणि गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला या गरीब महिलांना देऊ लागले. म्हणजे मासिक पाळी येण्याचा प्रश्न येणार नाही व मजुरी बुडणार नाही. या भयंकर प्रथेचे चित्रण ‘बिटरस्वीट’ मध्ये करण्यात आलं आहे.

या चित्रपटाची पटकथा व दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केलं असून अक्षया गुरव, सुदेश विश्वकर्मा, स्मिता तांबे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. “ही भारताच्या साखर निर्मिती मागच्या वेदनांची कथा आहे. आपण जी साखर वापरतो, ती आयुष्यात किती कडू असते, ते या कथेतून कळते,” असे उदगार  अनंत महादेवन यांनी काढले.
नंदकिशोर धुरंधर