मुंबईच्या चाळींमध्ये दिवाळीचा थाटमाट (Tradition...

मुंबईच्या चाळींमध्ये दिवाळीचा थाटमाट (Traditional Diwali Celebrations In Mumbai Chawls)

मुंबईच्या चाळींचा मोठा इतिहास आहे. आज मुंबई टोलेजंग टॉवर्सनी वेढलेली असली तरी पूर्वीच्या मुंबईतील नागरिकांचा निवारा म्हणजे चाळ होती.

या चाळींमध्ये सर्व लोक गुण्यागोविंदाने, एकोप्याने राहत असत. गणेशोत्सव, दिवाळी हे सण थाटामाटात साजरी करण्याची चाळीतली परंपरा आजही टिकून आहे.

बव्हंशी चाळीत एकाच प्रकारचे आकाश कंदिल, दिवाळीत लावून एकोप्याचे दर्शन घडविण्याची संस्कृती अद्यापही लोक जपतात.

मुंबईच्या गिरगाव, वरळी, दादर, नायगांव, परळ, या विभागातील चाळसंस्कृती अद्याप टिकून आहे. त्यातील दिवाळसणाची, आकाश कंदिलांची ही झलक.