होळीच्या दिवशी दिग्दर्शक गिरीश मलिक यांच्या मुल...

होळीच्या दिवशी दिग्दर्शक गिरीश मलिक यांच्या मुलाचा झालेला मृत्यू अपघात नव्हे, आत्महत्या. दारू पिण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसान (‘Torbaaz’ Director Girish Malik’s Son Committed Suicide After Girish Asked His Son Mannan To Stop Drinking- Report)

‘तोरबाज’ चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मलिक यांच्या घरी होळीच्या दिवशी दुर्घटना घडली. त्या दिवशी त्यांच्या १८ वर्षाच्या तरुण मुलाचा मृत्यू झाला. अंधेरी पश्चिमेस असलेल्या ओबेरॉय स्प्रिंग्ज्‌ बिल्डींगमध्ये मलिक राहतात. त्यांच्या मुलाचा, इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने अंत झाला, त्यावेळी हा अपघात होता की, आत्महत्या हे स्पष्ट झाले नव्हते. पण आता पोलिसांनी खुलासा केला की, ती आत्महत्या होती.

होळीच्या दिवशी रंग खेळायला मनन बाहेर गेला होता. तो घरी परतला तेव्हा दारूने धुंद झाला होता. तरीपण तो घरी पुन्हा दारु पिऊ लागला. म्हणून त्याचे पिताजी त्याला मनाई करु लागले. पण त्याने अजिबात ऐकलं नाही. रागाच्या भरात त्याने खिडकी फोडली व बाहेर उडी घेतली.

दारू पिण्यावरून या आधी देखील मननचे आपल्या आईशी भांडण झाले होते. तो नेहमीच आईशी आक्रमक होत असे. दारू प्यायल्यानंतर मनन आपला तोल सांभाळू शकत नव्हता. होळीच्या दिवशी भांडण झाल्यावर आई किचनमध्ये व वडील आपल्या खोलीत गेले. तेव्हा मननने खिडकी तोडून बाहेर उडी घेतली.

या दुर्घटनेबद्दल संजय दत्तला मोठाच धक्का बसला आहे. झाल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करून संजय दत्तने सांगितले की, या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तो दोनदा मननला भेटलेला आहे.