रिहानाने अनावृत्त होऊन केला गणपतीचा अपमान. लोक ...

रिहानाने अनावृत्त होऊन केला गणपतीचा अपमान. लोक करताहेत धिक्कार (Topless Rihana Insults Lord Ganesh: Netizens Strongly Protest)

अमेरिकन पॉप सिंगर रिहाना हिने आपल्या ट्विटर अकाउंटवर स्वतःचे अनावृत्त छायाचित्र टाकून मोठया वादाला तोंड फोडले आहे. या छायाचित्रात ती टॉपलेस असून गळ्यामध्ये मोठी चेन घातली आहे. त्यामध्ये रिहानाने गणपती बाप्पाचे पेंडन्ट घालून त्याचे प्रदर्शन केले आहे. हे अनावृत्त छायाचित्र तिनं तिकडच्या लॉन्जरी ब्रॅण्डच्या प्रमोशनसाठी काढले आहे व आपल्या ट्विटर वर शेअर केले आहे. रिहाना या छायाचित्रात अर्धनग्न दिसत असून खाली तिनं फक्त जांभळ्या रंगाचे शॉर्टस  घातले आहे . तिचे हे छायाचित्र प्रचंड प्रमाणावर व्हायरल झालं असून आपल्या देशात मात्र खळबळ माजविली आहे. हिंदू आराध्य दैवताचा रिहानाने अपमान केला असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी तिचा धिक्कार केला आहे. भाजपा नेते राम कदम यांनी रिहानाचे हे कृत्य ‘भयंकर’ असल्याची टिपणी केली आहे. हिंदू दैवतांची रिहानाने चेष्टा केली असल्याचे ते म्हणतात.

काही दिवसांपूर्वी भारतात चाललेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देऊन रिहाना चर्चेत आली होती. तिला पाठिंबा देण्यासाठी काही परदेशी सेलिब्रिटीज पुढे आल्या होत्या. ग्रेटा थनबर्ग आणि दिशा या आपल्याकडील तथाकथित मान्यवरांनी टूलकिट वादात उडी घेऊन तिला व शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला होता. यापैकी दिशा रवि व इतर काही जणांना अटक करण्यात आली आहे.

मात्र रिहानाने केलेल्या गणपतीच्या अपमानाबद्दल तिचा आपल्या देशातील नागरिकांकडून मोठया प्रमाणात धिक्कार केला जात आहे.