‘सातारचा सलमान’ चित्रपटात झळकणार &#...

‘सातारचा सलमान’ चित्रपटात झळकणार ‘हे’ नामवंत चेहरे (Top Leading Actors Like Mahesh Manjrekar, Sai Tamhankar To Appear In ” Satarcha Salman”)

काही दिवसांपूर्वीच प्रकाश सिंघी, टेक्सास स्टुडिओज निर्मित, रिलायन्स एन्टरटेन्मेंट प्रदर्शित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सातारचा सलमान’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हिरो बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य तरुणाची ही कथा आहे. त्याचा सामान्य तरुण ते हिरो बनण्यापर्यंतचा रंजक प्रवास यात दाखवण्यात आला आहे.

ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यात सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका असून त्यांच्या जबरदस्त अभिनयाची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र या ट्रेलरमध्ये आणखी एक गोष्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे, ती म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील काही नामवंत कलाकार.

महेश मांजरेकर, सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, अनिकेत विश्वासराव, नेहा महाजन, कमलेश सावंत यांचे चेहरेही या ट्रेलरमध्ये झळकले आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती, या कलाकारांच्या ‘सातारच्या सलमान’मध्ये नेमक्या काय भूमिका आहेत? मात्र हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ३ मार्चपर्यंत वाट पाहावी लागेल.