जुन्या जमान्यातील ७ फिट आणि हॉट अभिनेत्री (Top ...

जुन्या जमान्यातील ७ फिट आणि हॉट अभिनेत्री (Top 7 Fittest And Hottest Bollywood Actressess Of Yesteryear)

माला सिन्हा

एक जमाना गाजवलेली अभिनेत्री माला सिन्हा, नेपाळी ख्रिश्चन होती. दिसायला अतिशय देखणी असलेल्या मालाने जास्त करून, सर्वसाधारण कुटुंबवत्सल मुलीच्या भूमिका केल्या. पण ती ग्लॅमरस्‌ अंदाजात आली, तेव्हा प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या. ‘आंखे’ या चित्रपटात मालाचा हॉट अवतार दिसून आला होता. वेस्टर्न ड्रेसेसमध्ये ती परफेक्ट आणि फिट दिसली. तसं पाहिलं तर पारंपरिक ड्रेसेसमध्ये – म्हणजे साडी व पंजाबी सुटात तिचा कमनीय देह उठून दिसत होता. मात्र ‘नाईट इन लंदन’, ‘आंखे’ या चित्रपटातील तिचा वेस्टर्न ड्रेसेसमधला हॉट लूक पाहून, ती किती मादक दिसू शकते, याचा अंदाज आला.

मुमताज

फिट बॉडी आणि निरागस स्मितहास्य हे मुमताजचे वैशिष्ट्य होतं. ज्या जमान्यात नायिका भरदार शरीराच्या होत्या, त्या जमान्यात मुमताजने फिटनेस बाबत आपली वेगळीच इमेज प्रस्थापित केली होती. तिच्या सपाट पोटाचं गुपित काय आहे, याचं सगळ्यांना औत्सुक्य होतं. आधी किरकोळ भूमिका, नंतर खलनायिका आणि पुढे प्रमुख नायिका झालेल्या मुमताजचा अभिनेत्री म्हणून प्रवास संघर्षाचा होता. तिचा लूक सेक्सी होता, पण तिच्याकडे अभिनय गुण होते. म्हणूनच सुपरस्टार राजेश खन्नाची ती आवडती होती. ‘खिलौना’ चित्रपटातील पीडित तरुणी ते ‘आप की कसम’ ची रोमॅन्टिक नायिका आणि दारासिंगची नायिका ते ‘पत्थर के सनम’ ची खलनायिका, अशा साऱ्याच भूमिका तिने उत्तम केल्या.

सायरा बानू

सायरा बानू या चित्रसृष्टीत आली तेव्हा अगदी नाजूक, साधीभोळी आणि सुंदर तरुणी, अशी तिची इमेज झाली होती. पुढे हळूहळू तिची चित्रपटात प्रगती होत गेली, तसतशी ती मॉडर्न रुपात दिसली. सेक्सी भूमिका करू लागली. ‘व्हिक्टोरिया नं. २०३’ या चित्रपटात तिने सेक्सी अंदाजात दृश्य दिले. तेव्हा तिची हॉट आणि फिट फिगर आणि फ्लॅट टमीवर प्रेक्षक फिदा झाले होते.

बबिता

फिट बॉडी आणि गरमागरम दृश्य देण्यात बबिता, जुन्या जमान्यात; आपल्या दोन्ही मुली करीना आणि करिश्मा यांच्यापेक्षा कमी नव्हती. पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही पोषाखात ती आपली फिट फिगर दाखवित होती.

शर्मिला टागोर

जुन्या जमान्यात शर्मिला टागोर सर्वाधिक स्टायलिश अभिनेत्री गणली जात होती. अमर प्रेम, आराधना, अशा अतीव लोकप्रिय चित्रपटांमध्ये शर्मिला साडी नेसून सुंदर, फिट, कमनीय दिसली होती. पण ‘इन्हनिंग इन पॅरीस’  या चित्रपटात बिकिनी घालून तिने आधीच धमाल उडवली होती. बिकिनीमध्ये ती इतकी हॉट दिसली होती की, प्रेक्षकांची तिने झोप उडवली होती.

नूतन

साधी, सोज्वळ अशी इमेज असलेली नूतन अभिनय सम्राज्ञी होती. साध्या साडीत देखील तिचे शरीर फिट दिसून यायचे. तिला उत्तम उंची आणि सोज्वळ सौंदर्य लाभले होते. ‘बंदिनी’, ‘सरस्वतीचंद्र’ या चित्रपटात तिचे हे गुण प्रकर्षाने दिसून आले होते. तिची इमेज घरंदाज तरुणीची होती, पण प्रत्यक्ष जीवनात ती बऱ्यापैकी धाडसी आणि मोकळ्या विचारांची होती. त्यामुळेच रुपेरी पडद्यावर बिकिनी घालून वावरण्याचा प्रसंग आला, तेव्हा तिने जराही संकोच बाळगला नाही. त्या रुपात ती फिट आणि हॉट दिसली होती.

मधुबाला

रुपेरी पडद्यावरील सौंदर्यवती अशी मधुबालाची ख्याती आहे. तिच्या सौंदर्याचा मापदंड आजही दाखविला जातो. रंग, रुप आणि कोणत्याही ड्रेसमध्ये ती अतिशय फिट आणि सुंदर दिसली होती. ‘चलती का नाम गाडी’ मधील ‘एक लडकी भिगी भागीसी’ या गाण्यातील तिचे ओलेते रूप आजही विसरता येत नाही. लहान वयातच ती हे जग सोडून गेली असली तरी तिच्या सौंदर्याच्या, सुहास्याच्या, कमनीय देहाच्या खुणा मागे राहिल्या आहेत. पारंपरिक तसेच वेस्टर्न कपड्यांमध्ये देखील मधुबालाचे सौंदर्य खुलून येत असे.