रुपेरी पडद्यावर गाजलेल्या ५ टॉप जोडया आणि त्यां...

रुपेरी पडद्यावर गाजलेल्या ५ टॉप जोडया आणि त्यांचे सुपरहिट चित्रपट (Top 5 Onscreen Couples Of Bollywood Wha Has Given Many Superhit Films Together)

बॉलिवूडचे चित्रपट करमणूकप्रधान कथानक, मधूर संगीत आणि कलाकारांच्या कसदार अभिनयावर हिट होतात. अशा चित्रपटातील नायक – नायिकांची जोडी मग हिट समजली जाते. त्यांचे पडद्यावरील प्रेम, दाखवलेली जवळीक, प्रणय या गोष्टी प्रेक्षकांना आवडतात. मग निर्माते-दिग्दर्शक या जोडीला घेऊन आणखी चित्रपट बनवतात. अशा गाजलेल्या ५ जोड्या कोणत्या ते पाहूया. या जोड्यांनी एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत.


अमिताभ बच्चन – रेखा

छायाचित्र – सौजन्य – इन्स्टाग्राम
महानायक अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी बॉलिवूडमध्ये ज्या सदाबहार जोड्या आहेत त्यापैकी एक मानली जाते. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिलेत. सिलसिला, मिस्टर नटवरलाल, खून पसीना, दो अंजाने, सुहाग, मुक्कदर का सिंकदर असे काही चित्रपट त्या यादीत आहेत. दोघांची पडद्यावरील केमेस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती, अन्‌ त्यांच्या अफेअर्सच्या बातम्या खूपच चर्चेत राहिल्या होत्या.
राजेश खन्ना – शर्मिला टागोर

छायाचित्र सौजन्य – इन्स्टाग्राम
सुपरस्टार राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर या जोडीचे बरेच चित्रपट सुपरहिट झाले होते. दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीवर लोकांनी खूप प्रेम दिलं. आराधना, अमर प्रेम असे सुपरहिट चित्रपट त्यांच्या खात्यावर जमा आहेत.

शाहरुख खान – काजोल

छायाचित्र सौजन्य – इन्स्टाग्राम
शाहरुख खान आणि काजोल ही जोडी बऱ्याच चित्रपटात चमकली होती. त्यांची पडद्यावरील अदाकारी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता है, बाजीगर, कभी खुशी कभी गम असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले.
अनिल कपूर – माधुरी दिक्षीत

छायाचित्र सौजन्य – इन्स्टाग्राम
अनिल कपूर आणि माधुरी दिक्षीत यांचीही जोडी लोकप्रिय झाली होती. या दोघांनी जवळपास १७-१८ चित्रपटांमधून एकत्र काम केले. तेजाब, राम लखन, बेटा, पुकार, खेल, जमाई राजा असे त्यांचे चित्रपट खूपच गाजले. ही जोडी टोटल धमाल या अलीकडच्या चित्रपटात शेवटची दिसली होती.
गोविंदा – करिश्मा कपूर

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
बॉलिवूडचा हिरो नंबर १ म्हणून ख्याती पावलेला गोविंदा आणि करिश्मा कपूर यांची जोडी प्रेक्षकांची आवडती ठरली होती. त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. कुली नंबर वन, हिरो नंबर वन, राजा बाबू, हसीना मान जायेगी, खुद्दार हे त्यापैकी काही गाजलेले चित्रपट होते. गोविंदा आणि करिश्मा यांचे पडद्यावरील प्रेमप्रसंग लोकांना अतिशय आवडत. गोविंदाचा मिश्कील आणि करिश्माचा नटखट अभिनयाने हे चित्रपट आजही प्रेक्षकांचे आवडते आहेत.

पुरुषांच्या इंद्रियावर कमेंट करून दिया मिर्झाने माजवली खळबळ… (Dia Mirza’s Comment On Mens Private Part; People Surprised By Tweet)