विशेष समारंभासाठी १० नाविण्यपूर्ण ब्लाऊज डिझाइन...

विशेष समारंभासाठी १० नाविण्यपूर्ण ब्लाऊज डिझाइन्स (Top 10 Latest Blouse Designs For Special Occasions)

तुम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळा आणि कालानुरुप लूक हवा आहे, तर ब्लाऊजच्या नाविण्यपूर्ण डिझाइन्स ट्राय करून पाहा. विशेषतः आजच्या तरुणी साडीसोबत अशा स्टाईलिश डिझाइन्सचे ब्लाऊज घालणे पसंत करतात. तुम्हाला नवा ट्रेंडी लूक देणाऱ्या १० ब्लाऊजच्या डिझाइन्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

ब्लाऊजच्या नाविण्यपूर्ण डिझाइन्स

१)फ्रिल नेक ब्लाऊज

फ्रिल नेक ब्लाऊजमुळे तुम्ही मॉडर्न दिसता. हे ब्लाऊज तुम्ही स्कर्ट किंवा जीन्ससोबतही घालू शकता.

२) गोल्ड-सिल्वर डिझायनर नेक ब्लाऊज

गोल्ड-सिल्वर डिझायनर नेक ब्लाऊज तुमच्या अनेक साड्यांसोबत मॅच होतं. तसंच लेहंगा किंवा लांब स्कर्टसोबतही हे ब्लाऊज घालता येतं.

3) ज्वेल अटॅच्ड ब्लाऊज

कोणत्याही साध्या साडीवर ज्वेल अटॅच्ड ब्लाऊज घातल्यास साडीला रुबाबदार आणि राजेशाही लूक येतो.

४) एसिमिट्रिकल ब्लाऊज

एसिमिट्रिकल ब्लाऊज घालून तुम्ही सगळ्यांत अलग आणि खास दिसता. खास कार्यक्रमांसाठी तुमच्या कलेक्शनमध्ये एसिमिट्रिकल ब्लाऊज जरुर ठेवले पाहिजे.

५) एम्ब्रॉयडर्ड ब्लाऊज

एम्ब्रॉयडर्ड ब्लाऊजचं वैशिष्ट्य म्हणजे हे कोणत्याही साडीसोबत घातल्यानंतर त्या साडीचं सौंदर्य वाढतं. हे ब्लाऊज तुम्ही लेहंग्यासोबतही घालू शकता.

६) डीप नेक ब्लाऊज विद लटकन

या डिझाइनचं ब्लाऊज नेहमीच महिलांची पहिली पसंती ठरलं आहे. बाजारात लटकनमध्ये अनेक पर्याय उपलब्ध असतात, तुम्ही तुमच्या आवडीनुसार आपल्या डीप नेक ब्लाऊजला लटकनने सजवू शकता.

७) स्लीव्हलेस ब्लाऊज

स्लीव्हलेस ब्लाऊजमुळे आधुनिक लूक मिळतो. स्लिम-ट्रिम महिलांनी स्लीव्हलेस ब्लाऊज जरुर घातलं पाहिजे.

८) चोली स्टाईल ब्लाऊज

कोणत्याही पारंपरिक समारंभाच्या वेळेस तुम्ही चोली स्टाईल ब्लाऊज वापरून पाहा. हे ब्लाऊज तुम्ही कोणत्याही साडीसोबत वा लेहंग्यासोबतही घालू शकता.

९) हाय नेक ब्लाऊज

या डिझाइनचं ब्लाऊज अतिशय स्टाईलिश दिसतं. सडपातळ आणि उंच महिलांना हाय नेकचं ब्लाऊज शोभून दिसतं. या ब्लाऊजचा मागचा भाग तुम्ही तुमच्या पसंतीनुसार डिझाइन करून घेऊ शकता.

१०) कंटेक्प्रेरी बॅक नेक डिझाइन ब्लाऊज

कंटेक्प्रेरी बॅक नेक डिझाइन ब्लाऊज घालून तुम्ही सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्र बनू शकता. या ब्लाऊजच्या मागच्या नेक डिझाइनमुळे त्याचं सौंदर्य अधिकच खुलतं.