बॉलिवूडच्या या १० अभिनेत्रींनी बदलून घेतले नाव ...

बॉलिवूडच्या या १० अभिनेत्रींनी बदलून घेतले नाव (Top 10 Bollywood Actresses Who Changed Their Name For Fame)

नावात काय आहे? अशी म्हण आपण नेहमीच बोलतो, पण बॉलिवूडच्य या १० नट्यांनी आपलं खरं नाव बदलून घेतलं. सिनेसृष्टीत येण्यापूर्वीच यश मिळविण्यासाठी त्यांनी आपल्या नावात बदल केले. अन्‌ खरोखरीच नाव कमावलं आणि यश मिळवलं.

कियारा अडवाणी

इथे कमी वेळात प्रसिद्धी पावलेली नटी आहे कियारा अडवाणी. तिचं खरं नाव आलिया आहे. सिनेसृष्टीत येताच सलमान खानने तिला नाव बदलण्याचा सल्ला दिला. कारण कियारा चित्रपटसृष्टीत प्रवेश करत असताना आलिया भट्टने इथे चांगलाच जम बसवला होता. म्हणून तिने सलमानचा सल्ला ऐकून आपलं नाव बदलून कियारा ठेवलं.

कतरीना कैफ

कतरीनाने बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपलं नाव बदलून टाकलं. तिचं खरं नाव कॅट टरकोटे होतं. ते बदलून तिने कतरीना कैफ असं घेतलं.

शिल्पा शेट्टी

बॉलिवूडची फिटनेस प्रेमी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने देखील या सृष्टीत येण्यापूर्वीच नाव बदलले होते. तिचं खरं नाव अश्विनी होतं. शाळेत असतानाच तिचं नामकरण शिल्पा करण्यात आलं. खरं तर शिल्पाच्या आई-बाबांनी एका न्यूमरॉलॉजिस्टच्या सांगण्यावरून हे नाव बदललं होतं.

तब्बू

तब्बूचं खरं नाव फातिमा हाशमी आहे. पण ती आपलं नाव तब्बू लावते. हे नाव तिला देव आनंदने दिले.

सनी लिओनी

आता बॉलिवूडमध्ये स्टारपद मिळविलेली सनी लिओनी मूळची पॉर्न स्टार आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्याचप्रमाणे सनी लिओनी हे तिचं खरं नाव नाही. करणजीत कौर वोहरा हे तिचं असली नाव आहे. पॉर्न सृष्टीत प्रवेश करण्यापूर्वीच तिनं नाव बदलून घेतलं. सनी हे तिचं टोपण नाव होतं. त्यापुढे लिओनी हे आडनाव तिनं जोडलं.

प्रिती झिंटा

प्रिती झिंटाचं खरं नाव आहे प्रितम सिंह झिंटा. पण मॉडेलिंग आणि बॉलिवूड सृष्टीत येण्यापूर्वीच ती प्रितमची प्रिटी झाली.

रेखा

लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या रेखा या सुटसुटीत नावामागे गूढ आहे. तिचं खरं नाव आहे भानुरेखा गणेशन. त्या काळच्या दक्षिणेतील सुपरस्टारची ती मुलगी. पण मुंबईच्या चित्रसृष्टीत आल्याक्षणी तिनं आपल्या नावाचा शॉर्टकट करून रेखा हे नाव घेतलं.

महिमा चौधरी

महिमा चौधरीचं असली नाव रितू चौधरी असं होतं. तिनं ‘परदेस’ या चित्रपटातून पदार्पण केलं. त्याचे निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांनी तिला महिमा हे नाव दिलं.

श्रीदेवी

श्रीदेवी ही मुळची दाक्षिणात्य असल्याने तिचं खरं नाव लांबलचक होतं. श्री अम्मा यंगर अय्यप्पन असं तिचं नाव होतं. हे नाव सिनेसृष्टीत चाललं नसतं. म्हणून तिच्या आईनेच श्रीदेवी हे नाव तिला दिलं.

मधुबाला

सौंदर्यवती मधुबालाचं खरं नाव असंच लांबलचक होतं. मुमताज जेहान देहलवी हे तिचं खरं नाव. १९४२ साली मुमताजचा पहिला चित्रपट ‘बसंत’ आला. तेव्हा त्या काळच्या लोकप्रिय अभिनेत्री देविका राणी यांनी तिला मधुबाला हे नवीन नाव दिलं.