जगातील सर्वात आनंदी देश पुन्हा फिनलॅन्ड : भारता...

जगातील सर्वात आनंदी देश पुन्हा फिनलॅन्ड : भारताचा नंबर बराच खाली (Today World Happiness Day: Finland Is Number One In Happiness Again : India Much Down In The List)

आज जागतिक आनंदी दिन (इंटरनॅशनल हॅपीनेस डे) जगभरात साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने सादर केलेल्या यादीत, जगातील सर्वाधिक आनंदी देश म्हणून पुन्हा एकदा फिनलॅन्डचा पहिला नंबर आला आहे. विशेष म्हणजे फिनलॅन्डने हा मान सलग पाच वर्षे मिळाला आहे.

संयुक्त राष्ट्रांकडुन दरवर्षी ही यादी प्रसिद्ध केली जाते. वैयक्तीक पातळीवर असलेलं समाधान, चांगलं राहणीमान, आयुर्मान अशा निरनिराळ्या घटकांच्या आधारे सर्वेक्षण करून ही यादी तयार केली जाते. यंदाच्या २०२२ ची यादी करताना जगातील १४६ देशांचं मूल्यमापन केलं आहे.

त्यामध्ये फिनलॅन्डचा पहिला तर अफगाणिस्तानचा सगळ्यात शेवटचा नंबर आहे. तर भारताचा नंबर बराच नखाली, म्हणजे १३६व्या नंबरवर आहे.
स्वीडन आणि रशिया या देशांच्या मध्ये फिनलॅन्ड हा छोटासा देश असून तेथील लोक गेल्या ५ वर्षांपासून आनंदी जीवन जगत आहेत, असे या सर्वेक्षणावरून दिसते. फिनलॅन्डच्या नंतर डेन्मार्क, आइसलॅन्ड, स्वित्झर्लंड, नेदरलॅन्ड, लक्झमबर्ग, स्वीडन, नार्वे, इस्त्रायल आणि न्यूझीलंड या देशांचे क्रम लागतात.

ही यादी तयार करण्यासाठी त्या देशातील क्रम लागतात. ही यादी तयार करण्यासाठी त्या देशातील प्रगतीचा व लोकांच्या राहणीमानाचा साधारणपणे तीन वर्षांचा आढावा घेतला जातो. अशी यादी जाहीर करण्याचं यंदाचं दहावं वर्ष आहे.