जागतिक हृदय दिवस : असे बनवा आपले हृदय निरोगी (T...

जागतिक हृदय दिवस : असे बनवा आपले हृदय निरोगी (Today Is World Heart Day, Know What Things To Consume To Keep Healthy Heart)

संपूर्ण जगात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. आज २९ सप्टेंबरला जागतिक हृदय दिवस साजरा केला जातो. हृदय निरोगी राहण्याच्या दृष्टीने जागरुकता यावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आज लहान मुलांपासून वृद्धापर्यंत अनेकजण हृदयविकाराने ग्रस्त दिसतात. हृदयविकाराच्या रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय करावे हा प्रश्न आपल्याला अनेकदा त्रास देतो. खरं तर, हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहार महत्वाची भूमिका बजावतो. तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात निरोगी पदार्थांचा समावेश करू शकता.

World Heart Day, जागतिक हृदय दिवस

हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करणारे आहारातील पदार्थ –

१. हिरव्या भाज्या – हिरव्या भाज्या शरीराच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. तेव्हा हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश आवश्यक आहे. हिरव्या भाज्यांमध्ये तु्म्ही भेंडी, वांगं, फरसबी यांचं सेवन अधिक करा. या भाज्या कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.

२. दुग्धजन्य पदार्थ – चीज, दूध आणि दही यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये भरपूर पोषक तत्वे आढळतात, त्यांचे सेवन केल्याने केवळ हृदयच नाही तर संपूर्ण शरीर निरोगी राहू शकते.

World Heart Day, जागतिक हृदय दिवस

३. सुका मेवा : सुक्या मेव्यातील बदाम आणि अक्रोडमध्ये जीवनसत्त्वे आणि पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात.

४. फळे: पेरू, सफरचंद, संत्री यांसारखी हंगामी फळे पोषक तत्वांचा खजिना असल्याचे म्हटले जाते. त्यात आढळणारी जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर शरीरासाठी फायदेशीर मानले जातात. या फळांचा आहारात समावेश करून तुम्ही हृदय निरोगी ठेवू शकता.

World Heart Day, जागतिक हृदय दिवस

६. अन्नधान्य: रोजच्या आहारात धान्याचा समावेश हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. धान्यापासून बनविण्यात आलेलं पीठ, ब्रेड, डाळी इत्यादींचा समावेश करून आपण हृदय निरोगी ठेवू शकता. यामध्ये जीवनसत्त्वे, लोह आणि फायबर जास्त असतात, जे हृदयरोगाच्या जोखमीपासून संरक्षण करण्यास मदत करतात.