शाहरूख खानने गौरीच्या शोधात समुद्रकिनाऱ्यांचा प...

शाहरूख खानने गौरीच्या शोधात समुद्रकिनाऱ्यांचा पण शोध कसा घेतला होता… (To Find Gauri In Mumbai, Shahrukh Khan Had Made Rounds Of The Sea, The Actor Told An Interesting Anecdote)

शाहरूख खान आणि त्याची पत्नी गौरी यांचे लग्न ज्या परिस्थितीत झाले, त्या संबंधात स्वतः शाहरूखने अनेक किस्से वेळोवेळी प्रसिद्ध केले आहेत. त्यात भर टाकण्यासाठी म्हणून त्याने सांगितलं की, अशीच एकदा गौरी दिल्लीहून मुंबईला निघून आली. ते शाहरूखला माहीत नव्हतं. तिचा विरह सहन न झाल्याने तो तिच्या शोधात लगोलग मुंबईला आला होता.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

हिंदी चित्रसृष्टीत शाहरूख खानला ३० वर्षे झाली आहेत. दिल्लीचा एक सर्वसामान्य तरुण ते बॉलिवूडचा आत्ताचा बादशहा, हा त्याचा प्रवास सोपा नव्हता. तो लहान असतानाच त्याचे आई-बाबा देवाघरी गेले होते. तरुणपणी त्याचं गौरीवर मन जडलं तरी तिचा स्वीकार करण्यासाठी त्याला बरीच खटपट करावी लागली  होती.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

‘माय नेक्स्ट गेस्ट नीडस्‌ नो इंट्रोडक्शन…’ या कार्यक्रमात शाहरुखने आपल्या जीवनातील अज्ञात किस्से कथन केले. याच कार्यक्रमात सूत्रसंचालक डेव्हीड लेटरमॅनने शाहरूख व गौरी यांच्या संबंधात प्रश्न विचारले. तेव्हा तिला मिळवण्यासाठी काय काय यातायात करावी लागली, ते त्याने सांगितले.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

आपण दिल्लीत असतानाच गौरीच्या प्रेमात पडलो होतो, हे सांगून शाहरूख म्हणाला की, ती दिल्लीहून मुंबईला अचानक निघून आली. पण ती कुठे राहत होती, ते मला ठाऊक नव्हतं. तेव्हा तिला शोधण्यासाठी शाहरूख आपल्या मित्रांसह मुंबईला आला. तिला कुठे आणि कसं शोधावं, हे त्याला कळत नव्हतं. पण गौरीला समुद्राचं आकर्षण आहे, हे तो जाणून होता. तेव्हा ती समुद्रकिनारी आपल्याला भेटू शकेल, या आशेपोटी त्याने मुंबईत एक टॅक्सी भाड्याने गेतली. अन्‌ ड्रायव्हरला सांगितलं की, मला मुंबईच्या सर्व समुद्रकिनाऱ्यांवर घेऊन चल. त्यावेळी शाहरुखच्या खिशात फक्त ४०० रुपये होते. त्यामुळे टॅक्सी भाडे ४०० रुपये झाल्यावर टॅक्सी ड्रायव्हरने ते घेतले व त्याला एका समुद्रकिनारी सोडून दिले. मग शाहरूखची पायपीट सुरू झाली. तरीपण गौरी सापडत नाही, म्हणून शाहरूख परत जायला निघाला, तेवढ्यात त्याच्या कानावर एका मुलीचा आवाज पडला. शाहरूख त्या आवाजाच्या रोखाने परत फिरला, अन्‌ बघतो तो काय, ती गौरीच होती. अशा रितीने शाहरुखने महानगरी मुंबईतून आपली प्रियतमा गौरीला शोधून काढले.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

शाहरूखला अनपेक्षितरित्या मुंबईत पाहून गौरी चकित झाली. नंतर त्यांचे लग्न झाले व सुखाचा संसार सुरू झाला. शाहरुख-गौरीच्या लग्नाला ३० वर्षे झाली आहेत. त्यांना ३ मुले आहेत.

शाहरूखच्या कामकाजाबाबत बोलायचं तर ‘पठाण’ या चित्रपटात तो लवकरच दिसेल. या चित्रपटात त्याची नायिका दीपिका पादुकोण आहे तर जॉन अब्राहम सहनायक आहे.