‘अभिनेता होण्यासाठी स्वतःला ऑलिम्पिक खेळा...

‘अभिनेता होण्यासाठी स्वतःला ऑलिम्पिक खेळाडूंसारखे घडवा’ हृतिक रोशनचा उदयोन्मुख तरुणांना सल्ला. (To Become Actor, Prepare Yourself Like An Olympic Player – Hritik Roshan’s Guidance To Strugglers)

‘प्रत्येक पात्रात एक प्रकारचा वेडेपणा असतो. खरी जादू तेव्हा घडते जेव्हा एखाद्या अबिनेत्याला हा वेडेपणा समजतो’, असे उदगार सुपरस्टार हृतिक रोशन याने इफ्फीच्या  आभासी संभाषण सत्रात काढले.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
उदयोन्मुख अभिनेत्यांना सल्ला देताना हृतिक म्हणाला की,” त्यांनी स्वतःला ऑलिम्पिक खेळाडूंसारखे घडवले  पाहिजे. दररोज प्रशिक्षण व सरावासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत आणि सतत चित्रपट प्रेमींमध्ये  वावरले पाहिजे.” ओटीटी  मंचाच्या उदयामुळे, सर्व कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांना भरपूर वाव असल्याचे हृतिकने सांगितले.
या आभासी सत्रामध्ये लेखक-दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद सामील झाले होते. सूत्रसंचालन कोमल नहाटा  यांनी केले.
-नंदकिशोर धुरंधर

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम