टपून बसलेल्या फोटोग्राफर्सना जान्हवी कपूरने दाख...

टपून बसलेल्या फोटोग्राफर्सना जान्हवी कपूरने दाखवला कात्रजचा घाट:तिची युक्ती ऐकून खूप हसाल (To Avoid Paparazzi, Jhanvi Kapoor Came Up With Such A Trick, Knowing That You Will Be Laughing)

जान्हवी कपूर ही अशी गुणी स्टार किड आहे, जिने कमी वेळात आपले स्थान प्रस्थापित केले आहे. ती टपून बसलेल्या फोटोग्राफर्सची ( पॅपाराझी )पहिली पसंती बनली आहे. ते तिला जिथे जिथे गाठतात तिथे ती त्यांना आवडीच्या पोझेस देऊन खुश करते. पण एके दिवशी तिने या छायाचित्रकारांना चांगलाच चकमा दिला.

आजच्या काळात जो दिखता ‘है वो ही बिकता है’ अशी एक हिंदी म्हण आहे. त्यानुसार कलाकार मंडळी जर प्रसार मंडळांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून असले तर ते बऱ्यापैकी चर्चेत राहतात. जान्हवी पण अशीच एक आहे. ती जिमला जात असो, डान्स क्लासमध्ये जात असो किंवा मित्रमंडळींसोबत सहलीला गेली असो , या टपून बसलेल्या छायाचित्रकारांचे कॅमेरे तिच्यावर रोखले जातात.  पण या लोकांचा ससेमिरा कधी कधी कलावंताना नकोसो होतो. जान्हवीच्या बाबतीत असंच घडलं. अन् तिने या मीडियाच्या सदस्यांना कात्रजचा घाट दाखवला…

एका चॅट शोमध्ये स्वत:हून ही गोष्ट सांगितली. जिममध्ये असताना , आपला कोणी फोटो काढावा हो तिला पसंत नव्हतं. म्हणून तिने आपली मैत्रिण नम्रताकडे मदत मागितली. आज मला कोणी पाहावं किंवा माझा कोणी फोटो काढावा असं मला अजिबात वाटत नाही. असं सांगून जान्हवी मोटारीच्या डीकीत जाऊन लपली.

जान्हवीने सांगितले की त्या दिवशी मी फार थकली असल्याने जिममध्ये जाण्याची इच्छा नव्हती. म्हणून मी आपली कार बाहेर पाठवून दिली. तेव्हा फोटोग्राफर्सनी त्या कारचा पाठलाग केला. नंतर नम्रता माझ्या कारमध्ये आली. अन् आम्ही दोघी बाहेर पडलो. त्यावेळी फास्ट अॅण्ड फ्युरियस या चित्रपटात मी असल्याचा अनुभव आला.

जान्हवीने पुढे सांगितले की, आपली प्रायव्हसी राखण्यासाठी कधी कधी अशी युक्ती करावी लागते. कारण कितीही नको म्हटलं तरी हे पॅपाराझी तुम्हाला गाठल्याशिवाय राहत नाहीत.