टीना दत्तला आयुष्यभरासाठी सलतेय ही गोष्ट (Tina ...

टीना दत्तला आयुष्यभरासाठी सलतेय ही गोष्ट (Tina Datta will Regret This for the Rest of Her Life, Knowing You Will also Become Emotional)

‘उतरन’ या टीव्ही मालिकेतून घराघरात लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री टीना दत्ता सध्या वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ मुळे चर्चेत आहे. या शोमधील शालीन भनोटसोबतची जवळीक तिला प्रसिद्धीच्या झोतात आणत आहे. या सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने आपल्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले असले तरी, तिच्या आयुष्यात एक अशी गोष्ट आहे जिचा तिला कायम पश्चाताप होत राहणार आहे.

कलर्स टीव्हीवरील ‘उतरन’ या मालिकेत इच्छाची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवलेली टीना दत्ता सध्या ‘बिग बॉस 16’मध्ये दिसत आहे. मध्यंतरी टीना दत्ताला बिग बॉसने बाहेर येण्यास सांगितले, त्यानंतर ती कन्फेशन रूममधून घराबाहेर आली. त्यानंतर, पुन्हा एकदा टीना दत्ताला बिग बॉसने कन्फेशन रूममध्ये बोलावले होते.

कन्फेशन रूममध्ये गेल्यानंतर अभिनेत्रीला तिच्या पाळीव कुत्र्याची तब्येत खूप खराब असल्याचे सांगण्यात आले.मात्र जेव्हा टीना दत्ता काही वेळाने कन्फेशन रूममधून घराबाहेर पडली तेव्हा तिला तिच्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

ही बातमी ऐकून अभिनेत्री खूप दुःखी झाली, आपल्या लाडक्या पाळलेल्या कुत्र्याच्या शेवटच्या दिवसांत त्याच्यासोबत न राहिल्याचा टिनाला खूप पश्चाताप होत आहे. टीव्हीवर संस्कारी सूनेची भूमिका साकारणारी टीना आपल्या खऱ्या आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आहे. ती सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असते. तिथे तिचे 3.2 मिलियन फॉलोवर्स आहेत.