ठाण्याच्या रिक्षा स्टॅन्डवर ‘टाइमपास ३’ च्या टी...

ठाण्याच्या रिक्षा स्टॅन्डवर ‘टाइमपास ३’ च्या टीमने रिक्षाचालकांसोबत धरला ठेका (‘Timepass 3’ Team Dances With Rickshawallas At Thane Rickshaw Stand)

सध्या ‘टाइमपास ३’ चा सर्वत्र बोलबाला आहे. चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. त्यापैकीच एक ट्रेंडिंग गाणे म्हणजे ‘वाघाची डरकाळी’. नुकताच ठाण्यातील रिक्षा स्टँडवर हृता दुर्गुळे, प्रथमेश परब, मनमीत पेम यांनी या गाण्यावर ठेका धरला. या वेळी त्यांना रिक्षाचालकांनीही साथ दिली. विशेष म्हणजे यात काही महिला रिक्षाचालकही होत्या. या प्रसंगी दिग्दर्शक रवी जाधवही उपस्थित होते.

क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले आहे. तर हे गाण्याला वैशाली सामंतचा ठसकेबाज आवाज लाभला आहे. झी स्टुडिओज आणि अथांग कम्युनिकेशन्स निर्मित, रवी जाधव दिग्दर्शित ‘टाइमपास ३’ आज प्रदर्शित झाला आहे.