‘ती परत आलीय’ फेम ही कलाकार जोडी अड...

‘ती परत आलीय’ फेम ही कलाकार जोडी अडकली विवाहबंधनात (‘Ti Parat Aliy’ Fame Nachiket Devsthali And Tanvi Kulkarni Get Married)

सध्या लग्नाचा हंगाम सुरु झाला आहे. मनोरंजनसृष्टीतही हा लग्नाचा हंगाम सुरु असलेला पाहायला मिळतो. अनेक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकत आहेत. मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकार आपल्या जोडीदारासोबत सुखात संसार करत असताना आणखी एक जोडी विवाहबंधनात अडकली आहे. ती जोडी म्हणजे ती परत आलीय फेम अभिनेता नचिकेत देवस्थळी आणि अभिनेत्री तन्वी कुलकर्णी. काल या दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला.

नचिकेत आणि तन्वी ती परत आलीय या मालिकेत एकत्र काम करत होते. तेव्हाच त्यांची मैत्री घट्ट झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. पण सोबतच यांच्यातील प्रेमही फुलू लागले होते.

मालिका संपल्यानंतर जूनमध्ये त्यांनी साखरपुडा केला होता. तन्वीबद्दल सांगायचे झाल्यास तिने लहानपणापासूनच नाटकात काम करायला सुरुवात केली होती. तसेच तिने स्वराज्यरक्षक संभाजी या लोकप्रिय मालिकेत सगुणाबाईंची भूमिका साकारली होती. जुळता जुळता जुळतंय की, स्वराज्य जननी जिजामाता अशा मालिकांमधून तन्वी झळकली आहे.

तर नचिकेत सुखन या क्रार्यक्रमात काम करतो. या आधी त्याने रात्रीस खेळ चाले 1 या मालिकेत विश्वास हे पात्र साकारले होते. त्यानंतर तो 4 वर्षांनी ती परत आलीय या मालिकेत दिसला. तन्वी आणि नचिकेतच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहेत.