आलिया भट्टचे पप्पा महेश भट्ट यांनी तिच्या लग्ना...

आलिया भट्टचे पप्पा महेश भट्ट यांनी तिच्या लग्नाला बंदी घातली होती… का? (Throwback : Papa Did Not Want To Get Married…Says Alia Bhatt)

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आपल्या लग्नाच्या तयारीला लागले आहेत. पण आलियाचे पप्पा महेश भट्ट यांनी ती मोठी होताच तिच्या लग्नाला बंदी घातली होती. आलिया भट्टने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. त्यात तिने सांगितले होते की, माझे पप्पा लग्न करण्यास मनाई करत होते. अन्‌ असा काही विचार मनात जरी आणला तर बाथरूममध्ये तुला कोंडून ठेवीन, अशी धमकी दिली होती…

असं का वागले होते महेश भट्ट?… याचा खुलासा आलियाने केला आहे. ती म्हणते,” आपल्या मुलीच्या बाबतीत ते खूप पझेसिव्ह आहेत. मुलगी आपल्याला सोडून जाऊ नये असं त्यांना वाटत होतं. शाहीन आणि तुला मी बाथरूममध्ये कोंडून टाकीन. तुम्ही लग्नबिग्न काही करू नका.” ही गंमत समजू नका, ते खरोखरीच असं करू शकतात, असंही आलियानं पुढे म्हटलं आहे.

पडद्यावरील चुंबन दृश्य आणि प्रत्यक्ष जीवनात माझे डेटींग याबाबत देखील पप्पा खूप पझेसीव्ह आहेत, असं आलिया सांगते. करिअरच्या सुरुवातीला तिने पडद्यावर अर्जुन कपूर बरोबर चुंबन दृश्य दिले. मी फक्त ॲक्टिंग करते आहे, असं आलियानं पप्पांना सांगितलं. त्यावर महेश भट्ट म्हणाले की, तू माझ्या समक्ष जर कुणाचं चुंबन घेतलंस तर मी तुझ्या कानाखाली वाजवीन.

हे सगळं ऐकायला विचित्र वाटतंय्‌. कारण याच महेश भट्टसाहेबांनी कोणे एके काळी आपल्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी पुजा भट्ट हिचे चुंबन घेत असलेले फोटो एका नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्धीसाठी दिले होते. त्यावर वादंग माजले. तेव्हा याच महेशजींनी असं विधान केलं होतं की, पूजा माझी मुलगी नसती, तर मी तिच्याशी लग्न केलं असतं. यावरही पुन्हा इतके वादंग माजले की, हे महेशभाऊ डिप्रेशनमध्ये गेले होते. इतकंच नव्हे तर त्यांच्याच चित्रपटात पूजा भट्टने चुंबन दृश्ये दिली आहेत. आता बोला!

या पार्श्वभूमीवर आलियाने मांडलेले आपल्या वडिलांचे वास्तव चकीत करणारे आहे. आता रणबीरशी आलियाची शादी तिचे पप्पा होऊ देतात की, तिला खरोखरीच बाथरूममध्ये बंद करतात, ते पाहूया.

सर्व फोटो – सौजन्य – इन्स्टाग्राम

चाळीशी गाठलेल्या श्वेता तिवारीने दाखवला जवानीचा जलवा