विश्वविजेती मल्लखांबपटू मराठी तरुणीची यशोगाथा (...

विश्वविजेती मल्लखांबपटू मराठी तरुणीची यशोगाथा (Thrilling Story Of A Young Marathi ‘Mallakhamb’ Girl On T.V.)

मल्लखांब हा अत्यंत अवघड असा व्यायाम प्रकार आहे. एका खांबाच्या सहाय्याने किंवा खांबावर निष्णात क्रीडापटू थक्क करणारी कसरत करतात. लवचिक शरीरयष्टी असणारे मल्लखांबपटू या प्रकारावर कौशल्य मिळविण्यासाठी चिकाटी ठेवून कित्येक वर्षे खर्च करतात. मल्लखांब हा पुरुषांचे वर्चस्व असलेला क्रीडा प्रकार समजला जातो.

मात्र या क्रीडाप्रकारात महाराष्ट्रातील हिमानी परब या २१ वर्षांच्या तरुणीने मोठे नैपुण्य मिळविले आहे. योग, कुस्ती आणि जिमनॅस्टच्या सर्वोत्तम प्रकारांचा मेळ घालणारा ‘मल्लखांब’ हा व्यायाम प्रकार अतिशय अवघड आहे. पण आपल्या बहिणीपासून प्रेरणा घेत हिमानीने तो शिकला व चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर विश्वविजेतेपद मिळविले.

२०१९ साली झालेल्या जागतिक मल्लखांब चॅम्पियनशिपमध्ये हिमानी परबने ४ सुवर्ण आणि २ ब्रॉन्झ पदके मिळविली. तिच्या कामगिरीची दखल घेऊन २०२१ साली ‘मल्लखांब’ साठी तिला अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. खांब आणि दोरी यावर कसरत करून हिमानी जगाला अचंबित करते आहे. तिची ही यशोगाथा येत्या सोमवारी रात्री ८ वाजता हिस्ट्री टी.व्ही. १८ या चॅनलवरून ‘ओएमजी! ये मेरा इंडिया’ कार्यक्रमात प्रक्षेपित केली जाणार आहे.