आठवणी दाटतात… सुशांत सिंह राजपूतच्या अपूर...

आठवणी दाटतात… सुशांत सिंह राजपूतच्या अपूर्ण राहिलेल्या ५० इच्छा (This Was Sushant’s Bucket List Of 50 unfulfilled Wishes)

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. बरोबर एक वर्षापूर्वी १४ जून २०२० ला सुशांतने या जगाचा निरोप घेतला. याच दिवशी मुंबईतील त्याच्या राहत्या घरी तो मृत्यावस्थेत सापडला होता. परंतु, आजही नेहमी हसणारा, उत्साही असणारा, चंद्र-ताऱ्यांच्या गोष्टी सांगणारा अतिशय हुशार सुशांत आपल्यात नाही यावर विश्वास बसणं कठीण झालंय. सुशांतच्या निधनाला एक वर्ष होऊनही त्याचे कुटुंबिय आणि चाहते त्याच्या मृत्यूच्या धक्क्यातून अजूनही सावरलेले नाहीत.

आज सुशांतच्या पहिल्या स्मृती दिनी आपण त्याच्या अपूर्ण राहिलेल्या ५० इच्छा कोणत्या होत्या त्या जाणून घेणार आहोत. आपलं जीवन आपण कसं जगायचं हे त्यानं ठरवलं होतं. आपल्याला जे काही करायचं आहे त्याबाबतची यादी त्याने मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी १४ सप्टेंबर २०१९ ला ट्वीटरवरील एका पोस्टमध्ये शेअर केली होती. या पोस्टला त्याने कॅप्शन दिली होती, ‘MY 50 DREAMS & COUNTING! 123…’ ‘माझी ५० स्वप्नं आणि मोजणी सुरू आहे, १२३…’ एका पाठोपाठ ६ ट्वीट करत त्याने आपल्या स्वप्नांची ही यादी प्रसिद्ध केली होती. यातील काही इच्छाच तो पूर्ण करू शकला, बाकी बरीच स्वप्नं अपूर्ण राहिली.

सुशांतच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची यादी

विमान उडवायला शिकणे.

आर्यमॅन ट्रायथलॉनाठी तयारी करणे.

डाव्या हाताने क्रिकेट खेळणे.

मोर्स कोड शिकणे.

मुलांना अंतराळाबद्दल जाणून घेण्यासाठी मदत करणे.

चॅम्पियन्सबरोबर टेनिस खेळणे.

फोर क्लॅप पुश-अप करणे.

आठवडाभर चंद्र, मंगळ, बुध आणि शनि या ग्रहांचे त्यांच्या कक्षेत फिरताना निरिक्षण करणे.

ब्लू होलमध्ये जाणे.

डबल स्लिटचा प्रयोग करणे.

१ हजार झाडे लावणे.

दिल्लीमधील ज्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये मी शिकलो तिथे एक संध्याकाळ घालवणे.

इस्रोच्या कार्यशाळेत १०० मुलांना पाठवणे.

कैलाशमध्ये जाऊन ध्यानधारणा करणे.

पोकर विजेत्या स्पर्धकासोबत खेळणे.

पुस्तकाचे लेखन करणे.

औरोरा बोरेलिस रंगवणे.

नासाच्या कार्यशाळेत सहभागी होणे.

सहा महिन्यात सहा पॅक अॅब्स बनवणे.

सेनोट्समध्ये पोहणे.

नेत्रहिन व्यक्तींना कोडिंग शिकवणे.

जंगलात एक आठवडा घालवणे.

वैदिक ज्योतिष शिकणे.

डिस्नेलँडला जाणे.

एलआयजीओला जाणे आणि तिथल्या इमारतींवरून सूर्यास्त पाहणे.

घोडा पाळणे.

नृत्याचे दहा वेगळे वेगळे प्रकार शिकणे.

मोफत शिक्षणासाठी प्रयत्न करणे.

क्रिया योग शिकणे.

अंटार्क्टिकाला फिरायला जाणे.

एका मोठ्या दुर्बिणीतून ॲन्ड्रोमेडा गॅलॅक्सीचे निरिक्षण व अभ्यास करणे.

आत्मरक्षा मार्शल आर्टचे शिक्षण वर्दीतील महिलांना देण्यासाठी मदत करणे.

एका सक्रीय ज्वालामुखीला कॅमेऱ्यात कैद करणे.

शेती करायला शिकणे.

मुलांना डान्स शिकवणे.

तिरंदाजी शिकणे.

भौतिक विषयाची पुस्तके वाचणे.

पॉलिनेशियन खगोलशास्त्र शिकणे.

गिटार शिकणे आणि त्यावर ५० गाणी वाजवणे.

जगज्जेत्यासोबत बुद्धीबळ खेळणे.

लेम्बोर्गिनी गाडी विकत घेणे.

भारतीय संरक्षण दलासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी मदत करणे.

स्वामी विवेकानंदांवर एक वृत्तचित्र मालिका तयार करणे.

व्हिएन्नाच्या सेंट स्टीफन कॅथेड्रलला भेट देणे.

व्हिजिबल साऊंड आणि व्हायब्रेशनचे प्रयोग करणे.

सर्फ बोर्डवर लाटांशी खेळणे.

एआई आणि एक्सपोनेंशियन टेक्नॉलॉजीमध्ये काम करणे.

कौपोइरा शिकणे.

आर्टिफिशियल बुद्धीमत्तेवर काम करणे.

त्याची शेवटची इच्छा होती, ट्रेनने युरोपची सहल करणे.

अशा काही इच्छांचा समावेश सुशांतच्या यादीमध्ये होता. सुशांतच्या यातील अनेक इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत, याची खंत त्याच्या चाहत्यांना आहे.