सलमान- शाहरूख – आमीर या खान कलाकारांना मा...

सलमान- शाहरूख – आमीर या खान कलाकारांना मागे टाकून १ नंबर वर आला हा सुपरस्टार : सर्वाधिक लोकप्रिय स्टार्सची यादी प्रकाशित (This Superstar Became No.1, Leaving Behind Salman – Shahrukh – Aamir, The List Of Most Popular Stars Came Out)

ऑरमॅक्स मीडियावर एक पोस्ट या क्षणाला वेगाने व्हायरल होत आहे. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय नट आणि नट्यांची ही यादी आहे. ज्यामध्ये ३ खान मागे पडले आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

सर्वाधिक लोकप्रिय स्टार्सच्या यादीत अक्षयकुमारने पहिला नंबर पटकावला असून तो सुपरस्टार ठरला आहे. ‘लक्ष्मी’ हा अक्षयचा चित्रपट अलिकडे येऊन गेला, जो फ्लॉप झाला. तरी पण अक्षयला पहिल्या क्रमांकाचा मान मिळाला आहे.

शाहरुख खान

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

ऑरमॅक्स या यादीत शाहरूख खानला दुसरा नंबर मिळाला आहे. गेल्या काही वर्षात शाहरूखचा एकही नवीन चित्रपट आला नाही. मात्र ‘पठान’ या आगामी चित्रपटातून तो परत येण्याची तयारी करतो आहे.

हृतिक रोशन

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

तिसऱ्या स्थानावर हृतिक रोशन आला आहे, ‘कृष’ हा त्याचा आगामी चित्रपट असून, चाहते त्याची वाट पाहत आहेत.

सलमान खान

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

सुपरस्टार्सच्या या यादीत भाईजानची वर्णी ४ थ्या क्रमांकावर लागली आहे. त्याच्या चाहत्यांना यामुळे धक्का बसला असेल. पण त्याचे गेल्या काही वर्षात येऊन गेलेले चित्रपट चाहत्यांना संतोष देऊ शकलेले नाहीत.

आमिर खान

गेल्या २ वर्षांपासून आमिर खानचा एकही चित्रपट आलेला नाही. ‘लालसिंह चढ्ढा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सध्या तो व्यस्त आहे. पण या यादीत तो एकदम पिछाडीस म्हणजे ५ व्या स्थानावर गेला आहे.

रणवीर सिंह

ऑरमॅक्सच्या या यादीने एकमागून एक धक्के देत रणवीर सिंहला ६व्या स्थानावर टाकले आहे. महान अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देवच्या ‘८३’ या चरित्रपटात रणवीर काम करतो आहे. याशिवाय त्याच्याकडे कोणताच चित्रपट नाही.

ऑरमॅक्सच्या या यादीत राजकुमार राव ७, रणबीर कपूर ८, आयुषमान खुराणा ९ तर टायगर श्रॉफ १०व्या स्थानावर दिसतो आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

सर्वाधिक लोकप्रिय नटांबरोबरच सर्वाधिक लोकप्रिय नट्यांची यादी पण जाहीर झाली आहे. त्यामध्ये दीपिका पादुकोणने पहिला नंबर कायम ठेवला आहे. गेल्या वर्षीच्या (२०२०) यादीमध्ये देखील दीपिका, पहिल्या स्थानावरच होती.

दुसऱ्या स्थानावर आलिया भट्ट आली आहे. तर कतरिना कैफ ३, श्रद्धा कपूर ४, तापसी पन्नू ५, करीना कपूर खान ६, दिशा पटणी ७, कृती सेनन ८, कियारा अडवाणी ९ आणि प्रियंका चोप्रा जोनस १० व्या स्थानावर दिसते आहे.