सारा अली खान अशाप्रकारे आपली फिगर सांभाळते (Thi...

सारा अली खान अशाप्रकारे आपली फिगर सांभाळते (This Is How Sara Ali Khan Maintains Her Toned Figure)

सारा अली खानला बॉलिवूडमधील सुंदर आणि हुशार अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. सारा आता जरी एकदम चवळीची शेंग दिसत असली तरी इंडस्ट्रीत येण्यापूर्वी ती खूपच लठ्ठ होती.  वयाच्या 20 व्या वर्षी ती इतकी लठ्ठ होती की तिला पाहून कोणालाच वाटले नव्हते की ती अभिनेत्री बनू शकेल, पण साराने करुन दाखवले. तिने आपले वजन तर कमी केलेच पण इंडस्ट्रीत यशही मिळवले. आजच्या काळात तिची कमावलेली फिगर सर्वांना आकर्षित करते. पण हे सर्व साध्य करण्यासाठी तिला खूप कष्ट करावे लागले आहेत. जे प्रत्येकालाच जमते असे नाही. आज आम्ही तुम्हाला साराच्या फिगरची काही रहस्ये सांगणार आहोत.

सारा अली खानने अमेरिकेतून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. खरेतर त्यावेळी तिला करिअर अभिनयात करायचे की आणखी कशात हे माहित नव्हते. एका मुलाखतीदरम्यान, साराने स्वतः सांगितले होते की, जेव्हा मी ग्रॅज्युएशन करण्यासाठी अमेरिकेत गेली होती, तेव्हा एक दिवस मला अभिनेत्री व्हावेसे वाटले. त्यानंतर मी माझ्या आईला फोन केला आणि माझी अभिनेत्री बनण्याची इच्छा तिला सांगितली. त्यावर आई ठीक आहे बघू असे म्हणाली. त्यावेळी माझे वजन 96 किलो होते.

मुलाखतीदरम्यान साराने सांगितले की, माझे वजन अमेरिकेतच जास्त वाढले होते आणि तिथेच मी माझे वजन कमीही केले.पुढे ती म्हणाली, “मी दोन वर्षात पूर्ण होणारे माझे ग्रॅज्युएशन एका वर्षात पूर्ण केले आणि नंतर स्वत:ला वजन कमी करण्यास प्रवृत्त केले. मी पौष्टिक अन्न खाण्यास सुरुवात केली. फास्ट फूड सोडले. मी तिथे 30 किलो वजन कमी केले.” साराने सांगितले की, जेव्हा मी भारतात आली तेव्हा माझी आईसुद्धा मला ओळखू शकली नाही. तिने मला माझ्या सुटकेसवरून ओळखले.

साराच्या फिटनेस मंत्राबद्दल बोलायचे झाले तर ती संतुलित आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी वर्कआउट करणे खूप महत्त्वाचे असल्याचे अभिनेत्रीचे म्हणणे आहे. जर तुम्ही दररोज एक तास व्यायाम केलात तर तुम्ही शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या फिट राहाल. जास्त गोड खाऊ नका. समजा तुम्ही तासभर व्यायाम करुन घाम गाळलात आणि गोड खाल्ले तर तुमची सर्व मेहनत फुकट जाईल. याशिवाय सारा चांगली झोप घेते आणि भरपूर पाणी पिते.

साराचा आणखी एक फिटनेस मंत्र आहे, तो म्हणजे कधीही हार मानू नका. कधी कोणती गोष्ट अर्धवट सोडू नका. आज तुम्ही खूप व्यायाम केला आणि तुम्ही एक इंच कमी झालात असे होत नाही. जिम करुन , चांगला आहार घेऊनही एक आठवड्याने वजन कमी होत नाही म्हटल्यावर धीर सोडू नका. नियमित व्यायाम करत राहा.

सारा आठवड्यातून 6 दिवस जिममध्ये जाते आणि सुमारे दीड तास व्यायाम करते. कंबर आणि पायाची चरबी कमी करण्यासाठी साराने हार्डकोर इंटेन्सिव कार्डिओ केले. व्यायामाव्यतिरिक्त ती योगा देखील करते आणि नेहमी आनंदी असते.

एका मुलाखतीदरम्यान साराने सांगितले होते की, तिला नाश्त्यात इडली आणि ब्रेड टोस्ट खायला आवडते. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी ती फक्त घरचेच पदार्थ खाते. त्यामुळे कोल्ड्रिंक्स पिण्याऐवजी तिला प्रोटीन शेक प्यायला आवडतो.

सोशल मीडियावर सारा दररोज आपल्या वर्कआउटचे व्हिडिओ पोस्ट करत असते. तुम्हालाही सारा अली खानप्रमाणे स्वत:ला तंदुरुस्त आणि सुंदर ठेवायचे असेल, तर तिची दिनचर्या फॉलो करा आणि फिट राहा.