रणबीर-आलिया आपल्या चार महिन्याच्या राहाची अशी घ...

रणबीर-आलिया आपल्या चार महिन्याच्या राहाची अशी घेतात काळजी, लेकीसाठी घेणार कामातून ब्रेक (This is How Ranbir-Alia Takes Care of Four-Month-Old ‘Raha’, Will Take a Break From Work for Daughter)

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सतत आपापल्या चित्रपटांमध्ये व्यस्त असतात, पण व्यावसायिक कामांसोबतच ते आपल्या मुलीच्या संगोपनाचीसुद्धा विशेष काळजी घेत आहेत. आलिया भट्टने 6 नोव्हेंबर 2022 रोजी मुलगी राहाला जन्म दिला, त्यानंतर रणबीर आणि आलिया दोघेही आपल्या लेकीची काळजी घेत आहेत. दोघेही आपल्या चार महिन्यांच्या मुलीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी लवकरच कामातून ब्रेक घेणार असल्याचे बोलले जात आहे.

मुलगी झाल्यापासून रणबीर आपल्या लेकीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला तिच्यासोबत खेळायला खूप आवडते. आलियाने राहाला दूध पाजल्यावर रणबीर तिला ढेकर काढण्यास मदत करतो. राहाच्या बाबतीतली कामे रणबीर आणि आलियाने वाटून घेतली आहेत. तसेच कामानिमित्त जरी रणबीर बाहेर असला तरी तिथे सुद्धा अनेकदा तो राहाचा उल्लेख करतो.

रणबीरला आपली मुलगी राहा ही आई आलिया भट्टसारखी आणि स्टायलिश व्हावी अशी इच्छा आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत रणबीरने सांगितले की, मी माझ्या चार महिन्यांच्या मुलीसाठी एक किंवा दोन नाही तर 30 जोडे शूज खरेदी केले आहेत, पण त्यातला एकही तिला नीट होत नाही.

राहाने मोठी होऊन आलियासारखे दिसावे, परंतु तिचे व्यक्तिमत्त्व माझ्यासारखे असावे, असे त्याने मुलाखतीत सांगितले. आजकाल रणबीर सगळीकडे आपली वाढलेली दाढी असा लूक घेऊन फिरतो. ज्याबद्दल अभिनेता म्हणाला, जन्मल्यापासून राहाने मला असेच पाहिले आहे. आथा मी जर दाढी केली आणि राहाने मला ओळखले नाही तर माझे मन दुखावले जाईल.

‘तू झुठी मैं मक्कर’ या चित्रपटानंतर अभिनेता आता ‘एनिमल’ चित्रपटात दिसणार आहे. याच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सध्या तो व्यस्त आहे. त्यामुळे त्याला आपल्या मुलीसोबत वेळ घालवायला मिळत नाही, म्हणूनच एप्रिलनंतर चित्रपटांमधून सुमारे 5-6 महिन्यांचा ब्रेक घेण्याचे ठरवले आहे, जेणेकरून तो जास्तीत जास्त वेळ राहासोबत घालवू शकेल.

तर दुसरीकडे आलिया भट्ट आपल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे शूटिंग काश्मीरमध्ये सुरू आहे. ‘हार्ट ऑफ स्टोन’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ नंतर तिने कोणत्याही चित्रपटाची घोषणा केली नसल्यामुळे आलिया भट्टसुद्धा आपल्या मुलीसाठी कामातून ब्रेक घेऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.