आलियासोबत काम करु इच्छिते ही बॉलिवूड अभिनेत्री,...
आलियासोबत काम करु इच्छिते ही बॉलिवूड अभिनेत्री, गंगूबाई काठियावाड़ी पाहून झाली प्रभावित(This Hollywood Actress Wants To Work With Alia Bhatt, Impressed After Watching Gangubai Kathiawadi)

2022 मधील सर्वात मोठ्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीत ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे. या चित्रपटातील आलिया भट्टच्या जबरदस्त अभिनयाने सगळ्यांनाच तिचे वेड लावले होते. संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड बनवून प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटाला भारतातच नाही तर परदेशातही भरभरून प्रेम मिळाले. अशा परिस्थितीत मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स टेलिव्हिजन सिरीज लोकीमध्ये सिल्वीची भूमिका करणारी अभिनेत्री सोफिया डी मार्टिनो हिने आलिया भट्टचे कौतुक केले आहे.
सोफिया डी मार्टिनोने जेव्हा आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट पाहिला तेव्हा ती आलियाच्या अभिनयाने इतकी प्रभावित झाली होती की, तिचे कौतुक करण्यापासून ती स्वतःला रोखू शकली नाही. हॉलिवूड अभिनेत्रीने सोशल मीडियावर याचा उल्लेख केला आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करत सोफियाने लिहिले की, “Woahhhh, वॉट अ टर्न @aliabhat is going to take over the world in about a minute and a half.#Gangubaikathiawadi..”
Oh come on someone put us in a movie together so our kids can be best friends 😂♥️ https://t.co/3k9yOXDYC5
— Sophia Di Martino (@sophiadimartino) December 29, 2022
इतकेच नाही तर ब्लिक सोफियाने आलियाच्या चाहत्याने केलेले ट्विट रिट्विट करत लिहिले की, “अरे कोणीतरी आम्हाला एकत्र मूव्ही करायला लावा जेणेकरून आमची मुले सर्वोत्तम मित्र बनू शकतील”.
सोफिया डी मार्टिनोकडून अशी प्रशंसा मिळणे ही आलिया भट्टसाठी मोठी गोष्ट आहे. आलियानेही सोफियाच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आणि तिची पोस्ट पुन्हा शेअर करत लिहिले, “जो संपूर्ण मल्टीवर्स ताब्यात घेणारी आहे अशा व्यक्तीकडून हे ऐकणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.”
संजय लीला भन्साळी हे बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांच्या चित्रपटात काम करावे ही प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. संजय लीला भन्साळी यांना कलाकारांकडून सर्वोत्तम कसे काढायचे हे चांगले ठाऊक आहे, म्हणूनच ते इतके यशस्वी आहेत. आलिया भट्टचा किती टॅलेंटेड आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. आलिया कोणतेही पात्र अगदी सहज साकारते, म्हणूनच तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालतात.