बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने शेअर केला, शाळेच्या ...
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने शेअर केला, शाळेच्या गणवेशातील कुरळ्या केसांमधील लहानपणीचा फोटो, ओळखा पाहू? (This Bollywood Diva Shares An Adorable Childhood Photo In School Uniform, Catch Details)

चाहत्यांना नेहमीच त्यांच्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते त्यांचे न पाहिलेले बालपणीचे फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. म्हणूनच हे कलाकार अधूनमधून त्यांचे थ्रोबॅक फोटो शेअर करून चाहत्यांची इच्छा पूर्ण करतात.

यावेळी देखील, एका अभिनेत्रीने तिच्या शाळेच्या दिवसातील एक सुंदर छायाचित्र शेअर केले आहे, ज्यात तिचे लहान कुरळे केस आहेत आणि ती आपल्या मैत्रिणीसोबत शाळेच्या गणवेशामध्ये उभी आहे. तुम्ही तिला ओळखू शकता का? ही बॉलिवूड क्वीन आणि बिनधास्त कंगना रणौत आहे, जी कोणाशीही पंगा घ्यायला घाबरत नाही.
कंगनाने पांढरा आणि निळा रंगाचा शालेय गणवेश परिधान केला आहे आणि टायही घातला आहे. कंगनासोबत तिची एक मैत्रिण आहे. दोघी शेतात उभ्या असताना दिसताहेत. कंगनाने लिहिलंय – खोऱ्यातील छोटीशी शाळा… हिल व्ह्यू… वर्ष 1998 हिमाचल प्रदेश.
कंगनाचे हे छायाचित्र चाहत्यांची विशेष पसंती मिळवित आहे. चाहते या फोटोवर खूप कमेंट करत आहेत.

या चित्रात कंगना खरोखरच गोंडस दिसत आहे आणि यानंतर कंगनाने बालपणीचा आणखी एक फोटो शेअर केला ज्यात ती तिच्या मैत्रिणीसोबत माता राणीच्या मंदिरात दिसत आहे. कंगनाने लिहिले आहे की, खजान्यातून आणखी एक फोटो मिळाला, शाळेच्या सहलीपासून ते मंदिराच्या परिसरापर्यंत … जय माता दी…
या चित्रात कंगनाचे केस मोठे आहेत पण तिचा क्यूटनेस तसाच आहे.
कंगनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अलीकडेच तिचा थलायवी प्रदर्शित झाला परंतु फार यशस्वी ठरला नाही. आणि सध्या कंगना सीतेच्या भूमिकेबद्दल बरीच चर्चेत आहे.
फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम