वरुण धवनला या बॉलिवूड अभिनेत्रीने लहान असतानाच ...

वरुण धवनला या बॉलिवूड अभिनेत्रीने लहान असतानाच केलं होत प्रपोज (This Bollywood Actress had Proposed Varun Dhawan in Her Childhood, You will Also be Surprised to Know)

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटातून आपल्या करीअरला सुरुवात करणारा वरुण आज लाखो मनांवर राज्य करत आहे. वरुण धवनने आपली बालमैत्रीण आणि गर्लफ्रेंड नताशा दलाल हिच्याशी लग्न केले आहे. पण त्याआधी त्याला लहान असताना बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने प्रपोज केले होते.

वरुण धवन सध्या आपली पत्नी नताशा दलालसोबत वैवाहिक आयुष्य आनंदात घालवत आहे. पण आजच्या काळातील बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेल्या अभिनेत्रीने वरुण धवनला लहान असताना प्रपोज केले होते.

ती अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोण नाही तर श्रद्धा कपूर आहे. श्रद्धाला लहान असल्यापासूनच वरुण खूप आवडायचा. याबाबतचा खुलासा स्वत: श्रद्धाने एका मुलाखतीत केला होता. ती म्हणाली की, लहान असताना वरुण माझा क्रश होता. तेव्हा मला तो खूप आवडायचा.

लहानपणी वरुण आवडत असल्यामुळे, श्रध्दा त्याला एकदा डोंगरावर घेऊन गेली आणि त्याच्यासोबत एक गेम खेळत होती, ज्यामध्ये अभिनेत्रीने वरुणला सांगितले की ती काहीही बोलेल, वरुणने तो शब्द सरळ करुन बोलायचा.त्यानंतर खेळादरम्यान श्रद्धाने त्याला ‘यू लव्ह आय’ असे सांगितले. हे शब्द ऐकताच वरुण तिथून निघून गेला. तेव्हा दोघांमध्ये प्रेमाचे नाते निर्माण होऊ शकले नाही, पण आज दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.

श्रद्धाने वरुण धवनसोबत काही चित्रपटांमध्ये काम केले असून दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे. वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांनी ‘ABCD 2’ आणि ‘स्ट्रीट डान्सर 3D’ सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. या दोन्ही चित्रपटांमध्ये वरुण आणि श्रद्धा यांची रोमँटिक केमिस्ट्री लोकांना खूप आवडली होती.

वरुण धवनला त्याची पत्नी नताशा दलाल शाळेपासूनच आवडायची. लग्नाआधी दोघांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले. यानंतर वरुण आणि नताशा 24 जानेवारी 2021 ला लग्न केले.