अमिताभ बच्चनची भाडेकरू झाली आहे बॉलिवूडची अभिने...

अमिताभ बच्चनची भाडेकरू झाली आहे बॉलिवूडची अभिनेत्री : देणार लाखो रुपये भाडे (This Bollywood Actress Became The Tenant Of Amitabh Bachchan : Will Pay Rent In Lakhs)

बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या टेलिव्हिजनवरील ‘कौन बनेगा करोडपती १३’ हा शो होस्ट करत आहेत, ज्यामध्ये सामान्य स्पर्धकांबरोबरच लहान मुले आणि सेलिब्रिटीज देखील शानदार शुक्रवारमध्ये भाग घेतात. वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारे बिग बी केबीसीच्या सेटवर अनेक मनोरंजक किस्से त्यांच्या चाहत्यांसह शेअर करत असतात. अमिताभ बच्चन यांचे मुंबईत जलसा आणि प्रतीक्षा नावाचे आलिशान बंगले आहेत हे तर सर्वांना माहिती आहे, पण बिग बींनी नुकताच आपला एक डुप्लेक्स फ्लॅट भाड्याने दिला आहे आणि तोही एका सुंदर बॉलिवूड अभिनेत्रीला, हे तुम्हांला माहीत नसणार. मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) अमिताभ बच्चन यांच्या या फ्लॅटमध्ये भाड्याने राहायला आली आहे. बिग बींना या फ्लॅटचे ती लाखोंमध्ये भाडे देणार आहे.

Kriti Sanon

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

क्रिती सेननने अतिशय कमी वेळात आपल्या टॅलेंटच्या जोरावर बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलेल्या क्रितीची जीवनशैली वैभवशाली आहे. त्यामुळेच बिग बींच्या फ्लॅटमध्ये भाडेकरू म्हणून राहणे तिला सहज शक्य झाले आहे.

Amitabh Bachchan

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

Kriti Sanon

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

आपल्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली क्रिती मागील काही दिवसांपासून मुंबईत राहण्यासाठी घराच्या शोधात होती. आणि आता तिचा हा घराचा शोध थांबला असून तिने राहण्यासाठी एक घर भाड्याने घेतले आहे, जे दुसऱ्या-तिसऱ्या कोणा व्यक्तीचे नसून शतकातील सुपरहिरो बिग बी यांचा डुप्लेक्स फ्लॅट आहे. वास्तविक, क्रितीने अमिताभ बच्चन यांचा अंधेरी येथे असलेला डुप्लेक्स फ्लॅट भाड्याने घेतला आहे. यासाठी अभिनेत्रीने दोन वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली असून तिने बिग बींना सिक्युरिटी म्हणून फक्त ६० लाख रुपये दिल्याचे वृत्त आहे, तर या फ्लॅटचे महिन्याचे भाडे लाखोंमध्ये सांगितले जात आहे.

Kriti Sanon

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

माहितीनुसार, क्रिती सेनन अमिताभ बच्चन यांच्या डुप्लेक्स फ्लॅटच्या २७ व्या आणि २८व्या मजल्यावर राहणार आहे, जो २०२० मध्ये बिग बींनी सुमारे ३१ कोटी रुपयांना विकत घेतला होता. असे सांगितले जात आहे की, एका महानायकाची भाडेकरू बनून क्रिती खूप आनंदी आहे आणि भाडेकरू म्हणून क्रिती दर महिन्याला बिग बींना लाखोंचे भाडे देणार आहे.

Amitabh Bachchan

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

अलीकडेच क्रिती सेनन अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर पोहोचली होती, जिथे तिने प्रश्नांची उत्तरे देण्याबरोबरच खूप मजा केली. खुद्द बिग बींनीही क्रितीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यामध्ये ते बॉलरूममध्ये क्रितीसोबत डान्स करताना दिसत होते. या फोटोसोबत बिग बींनी कॅप्शन लिहिली- ‘लाल ड्रेसमध्ये सुंदर क्रिती सेननसोबत बॉलरूममध्ये डान्स केला. अहाहा… कॉलेज आणि कोलकात्याचे दिवस आठवले…”

Amitabh Bachchan

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

अलीकडेच सरोगेट मदर्सवरील ‘मिमी’ चित्रपटात क्रिती दिसली होती. तिच्या चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला आणि त्यांनी क्रितीच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक केले. तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये अनेक चित्रपटांचा समावेश आहे. लवकरच ती ‘आदिपुरुष’, ‘भेडिया’, ‘गणपत’ आणि ‘शहजादा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. शहजादा या चित्रपटात क्रिती कार्तिक आर्यन आणि परेश रावलसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.