बॉलिवूडच्या या तारका आहेत सासऱ्यांच्या लाडक्या ...
बॉलिवूडच्या या तारका आहेत सासऱ्यांच्या लाडक्या सूना, आता कतरिनाही झालीय तिच्या सासऱ्यांची लाडकी (This Bollywood actress are father-in-law’s beloved bahu, Katrina also shares cute bonding with her father-in-law)

कतरिना कैफ

नुकतेच लग्न झालेली कतरिना कैफ आता मिसेस कौशल आणि कौशल कुटुंबाची सून झाली आहे. सासरी पंजाबी रंगात रंगलेल्या कतरिनाला पाहून चाहते तिच्याकडे आदर्श सून म्हणून पाहू लागले आहेत. लग्नानंतर विकी शुटींगसाठी इंदौरला निघून गेल्यानंतर कतरिना लगेचच तिच्या सासू-सासऱ्यांना भेटण्यासाठी गेल्यामुळे सर्वजण तिची प्रशंसा करत आहेत. असं म्हणतात की, कतरिना आणि तिचे सासरे श्याम कौशल यांच्यात खास बाँडिंग आहे. लग्नाच्या संगीताच्या कार्यक्रमामध्ये कतरिना सासऱ्यांसोबत पंजाबी भांगडा करतानाचा त्यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. नक्कीच कतरिना तिच्या सासऱ्यांची लाडकी सून असणार.
कतरिनाच नव्हे तर बॉलिवूडमधे अशा अनेक तारका आहेत ज्या त्यांच्या सासऱ्यांच्या लाडक्या आहेत. पाहुयात त्या कोण आहेत?
प्रियंका चोप्रा

देसी गर्ल प्रियंका चोप्राचेही तिच्या सासरच्या मंडळींसोबत अतिशय आपुलकीचे नाते आहे. तिचे सासरे पॉल केविन जोनस आपल्या सूनेवर मुलीसारखं प्रेम करतात. निक जोनससोबत लग्न झाल्यानंतर कित्येकदा त्यांनी एकत्र वेळ घालवला आहे. प्रियंकाही अनेकदा सासऱ्यांसोबतचे फोटो शेअर करत असते. अन् तिचे सासू-सासरेही तिच्या फोटोंवर कमेंट्स करून त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करत असतात.
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, रणवीर आणि तिच्या चाहत्यांबरोबरच तिच्या सासरच्यांचीही फेव्हरेट आहे. विशेषतः सासऱ्यांची ती लाडकी सून आहे. सासरी तिला माहेरच्यांप्रमाणे प्रेम करणारी माणसं मिळाली आहेत, असे दीपिकानेच एकदा मुलाखतीत सांगितले होते. तिचे सासरे जगजीत सिंह भावनानी यांच्यासोबत तिचे नाते मुलीसारखे असून दोघांची छान मैत्री आहे. दीपिकाही त्यांचा वडिलांप्रमाणे मान राखते.
अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली बॉलिवूड आणि स्पोर्ट्स वर्ल्डमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. अनुष्काचेही तिच्या सासऱ्यांसोबत छान नाते आहे. तिचे सासरे आणि विराटचे वडील प्रेम कोहली बरेचदा या दोघांसोबत वेळ घालवताना मजामस्ती करताना दिसतात. दोघंही कुटुंबियांसोबत एकत्र गेम्स खेळतानाही दिसतात.
ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय देखील बच्चन परिवारची लाडकी सून आहे, विशेष करून सासरे अमिताभ बच्चन यांच्याशी तिचं वडिल आणि मुलीचं नातं आहे. सोशल मीडियावरील अमिताभ आणि ऐश्वर्या यांचे फोटो पाहूनच त्यांच्यातील बाँडिंगची कल्पना येते. अमिताभ ऐश्वर्याला मुलीसारखे वागवतात तर ऐश्वर्या देखील त्यांचा आपल्या वडिलांप्रमाणे आदर करते. अनेकदा ती स्टेजवरही त्यांच्या पाया पडून त्यांना गौरवताना दिसते.
सोनम कपूर

लग्नानंतर सोनम कपूर जास्त करून तिच्या सासरीच राहते. लंडनला पति आनंद आहूजासोबत राहणारी सोनमही तिच्या सासऱ्यांची लाडकी सून आहे. आणि तिचे सासरे सुनील आहूजा आपल्या सूनेची खूप काळजी घेताना दिसतात. सोनम बरेचदा सासू-सासऱ्यांसोबत सहलीला जाते आणि खूप मजा करते. त्याचे मजा करतानाचे फोटोही ती शेअर करते. लग्नानंतर एका मुलाखतीमध्ये सोनमने असे म्हटले होते की मी माझ्या वडिलांचं घर सोडून दुसऱ्या वडिलांच्या घरी आली आहे.
सुझान खान
हृतिक रोशन आणि सुझान खान यांचा घटस्फोट होऊन बरीच वर्षं झाली आहेत. तरीही सुझान आजही आपल्या आधीच्या सासरी तितकीच लाडाची आहे. कधीही ती सासरी गेली तरी तिला सासरच्यांकडून प्रेमळ वागणूक मिळते. तिचे सासरे आणि हृतिकचे वडिल राकेश रोशन आजही तिच्यावर तितकेच प्रेम करतात.