गौहर खानचे सौंदर्यच तिच्यासाठी ठरला शाप (This ...

गौहर खानचे सौंदर्यच तिच्यासाठी ठरला शाप (This Big Film Was Snatched From Gauhar Khan Due To Beauty)

टीव्ही पासून ते चित्रपटांपर्यंत अभिनेत्री गौहर खानने तिच्या अभिनयाची जादू सगळ्यांना दाखवली आहे. चित्रपटात काम करण्यासाठी आवश्यक असलेली हुशारी आणि सौंदर्य या दोन्ही गोष्टी गौहरकडे आहेत. पण तिच्या सौंदर्यामुळेच तिच्या हाती येणारे मोठे यश तिच्याकडून निसटले होते. ती खूप सुंदर असल्यामुळे तिला एका मोठ्या चित्रपटातून काढून टाकले होते. सौंदर्यामुळे कसा काय चित्रपट जाऊ शकतो असे तुम्हाला वाटेल पण हे खरे आहे. याबाबत स्वत: गौहर खानने खुलासा केला होता.

गौहरने सांगितले की,’’ सुंदर असल्यामुळे मला एका चित्रपटातून काढून टाकले होते. तो चित्रपट होता ऑस्कर विजेता चित्रपट स्लमडॉग मिलेनियर. तुम्ही सुंदर असाल म्हणजे तुम्हाला यश मिळतेच असे नाही. मी माझ्या सौंदर्यामुळे स्लमडॉग मिलेनियर सारख्या मोठ्या चित्रपटाला मुकले होते. मी या चित्रपटातील पात्रासाठी माझ्या लूकमुळे योग्य नाही असे चित्रपटाचे दिग्दर्शक डॅनी बॉयल यांनी सांगितले. मी त्या चित्रपटासाठी पाच वेळा ऑडिशन दिल्या. तेव्हा त्यांनी माझ्या अभिनयाचे खूप कौतुक केले. पण डॅनीला माझा चेहरा त्याला हव्या असलेल्या भूमिकेसाठी योग्य वाटला नाही. त्यामुळे त्या चित्रपटासाठी माझी कास्टिंग झाली नाही.

गौहरने पुढे सांगितले की, तिने डॅनीला ती झोपडीत राहण्यास सुद्धा तयार असल्याचे सांगितले पण तरीही सौंदर्यामुळे हा चित्रपट नाही मिळाला. पण चित्रपट हातून गेला तरी ही डॅनी सारख्या दिग्दर्शकाने तिच्या अभिनयाचे कौतुक केल्याचे तिला समाधान असल्याचे ती म्हणाली.