टीव्हीच्या या अभिनेत्रींना कमी वेळेतच मिळाली हो...

टीव्हीच्या या अभिनेत्रींना कमी वेळेतच मिळाली होती प्रसिद्धी(These Young TV Actresses Got Fame at a Young Age, You will be Surprised to Know Their Net Worth)

 ग्लॅमर इंडस्ट्रीत नाव आणि प्रसिद्धी मिळवणं प्रत्येक कलाकाराला जमेलच असं नाही. बरेच लोक इथे स्टार बनण्याची स्वप्ने घेऊन येतात, परंतु त्यातील काही मोजक्याच लोकांची स्वप्ने सत्यात उतरवतात. काही लोकांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी वर्षे लागतात तर काही लोक कमी वयात इंडस्ट्रीत स्थान मिळवतात. विशेषत: छोट्या पडद्यावर अशा अनेक तरुण अभिनेत्री आहेत, ज्यांना कमी वयात प्रसिद्धी मिळाली आहे. तसेच संपत्तीच्या बाबतीतही त्या छोट्या पडद्यावरच्या मोठ्या अभिनेत्रींना टक्कर देत आहेत.

अशनूर कौर

टीव्हीवर बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारी अशनूर कौर ही टीव्हीवरील आघाडीच्या तरुण अभिनेत्रींपैकी एक आहे. वयाच्या 18 व्या वर्षापासूनच अशनूरने टीव्ही इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 9 दशलक्षाहून अधिक लोक तिला फॉलो करतात. अभिनेत्रीची एकूण संपत्ती 11 कोटी रुपये आहे.

अवनीत कौर

टीव्हीवर नाव आणि प्रसिद्धी मिळवल्यानंतर अवनीत कौर आता मोठ्या पडद्याकडे वळली आहे. २१ वर्षीय अवनीत आपल्या चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. इंस्टाग्रामवर तिचे 32.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तिची एकूण संपत्ती सुमारे 11 कोटी रुपये आहे.

अनुष्का सेन

टीव्ही अभिनेत्री अनुष्का सेन अनेक मालिका आणि म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे. अनुष्का सेन लहान वयातच चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय झाली होती. 20 वर्षीय अनुष्काचे इंस्टाग्रामवर 39 दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि अभिनेत्रीची एकूण संपत्ती 14 कोटी रुपये आहे.

जन्नत जुबैर

टीव्हीची सर्वात लोकप्रिय आणि तरुण अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणार्‍या जन्नतनेही बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. २१ वर्षीय जन्नतने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती मोठ्या टीव्ही अभिनेत्रींना टक्कर देते. अभिनेत्रीला इंस्टाग्रामवर 44.8 दशलक्ष लोक फॉलो करतात, तर तिची एकूण संपत्ती 23 कोटी आहे.

अंजलि अरोड़ा

‘कच्चा बदाम’मधून लोकप्रियता मिळवलेली अंजली अरोडाही आपल्या चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. अंजलीचा डान्स बहुतेकांना खूप आवडतो. 22 वर्षीय अंजली हिला इंस्टाग्रामवर 12 दशलक्षाहून अधिक लोक फॉलो करतात, तर अभिनेत्रीची एकूण संपत्ती 3 कोटी रुपये आहे.