टीव्हीच्या या कलाकारांवर आलेली घटस्फोट घेण्याची...

टीव्हीच्या या कलाकारांवर आलेली घटस्फोट घेण्याची वेळ पण नाते वाचवण्यासाठी घेतला एकत्र राहण्याचा निर्णय (These TV Couples Decided to Stay Together to Save Their Relationship Instead Taking Divorce)

सर्वसामान्य जोडपे असोत किंवा ग्लॅमर इंडस्ट्रीशी संबंधित विवाहित जोडपे असोत, सहसा लग्नानंतर अनेकांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या येतात. एकीकडे जिथे अनेक जोडपी कठीण प्रसंगात एकमेकांची साथ सोडत नाहीत, तर दुसरीकडे अनेक जोडपी घटस्फोट घेऊन वेगळे होणे पसंत करतात, तर काही जोडपी मात्र घटस्फोटापर्यंत पोहोचल्यानंतरही आपले नाते टिकवण्यासाठी संधी देतात.  आज आम्ही तुम्हाला टीव्हीवरील अशाच काही जोडप्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यामध्ये परिस्थिती घटस्फोटापर्यंत पोहोचली, पण त्यांनी आपले नाते वाचवण्यासाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

चारू असोपा-राजीव सेन

चारू असोपा आणि राजीव सेन हे घटस्फोटाच्या बातम्यांमुळे बरेच दिवस चर्चेत होते, पण अलीकडेच त्यांनी आपल्या मुलीच्या संगोपनाचा विचार करून घटस्फोट न घेता एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ही गोड बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. त्यानंतर त्यांनी त्यांचा आपल्या मुलीसोबतचा एकत्र फोटो शेअर केला.

रुबीना दिलैक-अभिनव शुक्ला

‘बिग बॉस 14’ मध्ये येण्यापूर्वी टीव्हीची किन्नर बहू फेम रुबिना दिलैक आणि तिचा पती अभिनव शुक्ला यांनी घटस्फोट घेण्याचे ठरवले होते. दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आपल्या वेगळे होण्याच्या निर्णयाची माहिती दिली होती, मात्र बिग बॉसमध्ये आल्यानंतर दोघांनीही वेगळे होण्याऐवजी एकत्र राहून आपापसातील गोष्टी दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला. आज हे जोडपे पुन्हा एकत्र आले आहेत आणि आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत.

शक्ति अरोरा-नेहा सक्सेना

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता शक्ती अरोरा आणि त्याची पत्नी नेहा सक्सेना यांच्यात लग्नानंतर काहीसे बिनसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यासोबतच दोघेही विभक्त होत असल्याच्या बातम्याही चर्चेत आल्या, पण नंतर दोघांनी समजूतदारपणा दाखवत आपल्या नात्याला आणखी एक संधी देत ​​एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. हे जोडपे आज एकमेकांसोबत एकत्र राहत आहे.

बरखा सेनगुप्ता-इंद्रनील

अभिनेत्री बरखा सेनगुप्ता पती इंद्रनीलपासून विभक्त होत असल्याच्या बातम्या अनेकदा मीडियामध्ये आल्या होत्या. विभक्त होण्याच्या बातम्या येत असूनही दोघांनीही आपले लग्न वाचवण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट न घेता दोघांनी एकमेकांना आपले नाते दुरुस्त करण्याची संधी दिल्याचे बोलले जात आहे.

सुरभि तिवारी-प्रवीण सिन्हा

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सुरभी तिवारीचे पती प्रवीण सिन्हा यांच्याशी झाल्या भांडणामुळे मीडियात खूप चर्चेत आली. काही दिवसांपूर्वीच सुरभी तिवारीने आपल्या पतीवर घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप केले होते. अभिनेत्रीने त्यावेळी आपल्या पतीसोबत घटस्फोट घेण्याचे ठरवले होते. मात्र, अद्याप त्यांचा घटस्फोट झालेला नाही.