या टी. व्ही. तारकांनी नाकारले बिग बजेट चित्रपट ...

या टी. व्ही. तारकांनी नाकारले बिग बजेट चित्रपट (These TV Celebs Have Rejected Big Budget Films)

हिंदी चित्रपटसृष्टीच्या झगमगत्या दुनियेचे सगळ्यांनाच आकर्षण असते. चित्रपटात अभिनय करायला मिळण्याची एक तरी संधी मिळावी असे या कलाकार मंडळींचे स्वप्न असते. सध्या मनोरंजनाचं माध्यम म्हणून टी.व्ही.चा जास्त बोलबाला आहे. दिवसभर वेगवेगळ्या चॅनेल्सवर अनेक मालिका सुरू असतात. त्यामुळे छोट्या पडद्यावरही अभिनयासाठी आत्ताच्या तरुणाईला बराच वाव मिळू लागला आहे. आधी छोट्या पडद्यावर काम करून मग हळूहळू मोठ्या पडद्यावर काम करण्यासाठीची संधी ते शोधत असतात. पण टी.व्ही. वरील काही असेही कलाकार आहेत, ज्यांना समोरून बिग बजेट चित्रपटात काम करण्याची संधी चालून आली, परंतु त्यांनी ती स्वीकारली नाही. अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेऊया.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

दीपिका कक्कड – टी.व्ही. वरील लोकप्रिय मालिका ‘ससुराल सिमर का’ फेम दीपिका कक्कडने आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिसण्याबरोबरच अभिनयातही ती उत्तम आहे. दीपिका ही टी.व्ही. वरील रिॲलिटी शो बिग बॉसची विनरही झाली आहे. बिग बॉसच्या घरात असताना तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. परंतु, त्या चित्रटांमध्ये इंटिमेट सीन असल्यामुळ तिने त्या नाकारल्या. मात्र २०१८ मध्ये आलेल्या ‘पलटन’ या चित्रपटामध्ये तिने काम केलं होतं.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

शाहीर शेख – टी.व्ही. इंडस्ट्रीतील अभिनेता शाहीर शेख हे सुपरिचीत नाव आहे. त्याने टेलिव्हिजनवरील अनेक यशस्वी मालिकांत काम केले आहे. ज्यात ‘झांसी की रानी’, ‘महाभारत’ आणि ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ यांचा समावेश आहे. मागे एका मुलाखतीमध्ये शाहीर शेखने म्हटले होते की, “मला चित्रपटांच्या अनेक ऑफर्स आल्या, पण दरवेळी मी त्या नाकारल्या. मोठ-मोठ्या चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक टी.व्ही. वरील कलाकारांना चित्रपटात लीड रोल देत नाहीत. त्यापेक्षा टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये निदान मी माझ्या आवडीची भूमिका करू शकतो.”  

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

सुरभी चांदना – टेलिव्हिजनवरील सर्वाधिक स्टायलिश अभिनेत्री सुरभी चांदनाने अनेक टी.व्ही. शोजमध्ये आपल्या अभिनयकौशल्याने लोकांचे मन जिंकले आहे. सुरभीलाही चित्रपटांत काम करण्यासाठी अनेक ऑफर्स आल्या, परंतु तिने त्या सगळ्याच स्वीकारल्या नाहीत. पण नाही म्हणायला सुरभीने ‘बॉबू जासूस’ या चित्रपटात विद्या बालन सोबत काम केले आहे.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

अदा खान – टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका ‘नागिन’ मध्ये आपल्या अदांनी लोकांना जिने वेड लावले ती अदा खान ‘अमृत मंथन’, ‘परदेश में है मेरा दिल’ अशा इतरही मालिकांमधून दिसली. अदाकडेही चित्रपटात काम करण्याची संधी अनेकदा चालून आली, परंतु तिने आपण अजून चित्रपटात काम करण्यासाठी तयार नसल्याचे कारण सांगून त्या संधी नाकारल्या.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

दृष्टि धामी – ‘मधुबाला’ या शोमध्ये आपल्या अभिनयाने लोकांचं मन जिंकलेली अभिनेत्री दृष्टि धामीला चित्रपटात काम करण्यासाठी अनेकदा विचारण्यात आले. मधुबाला सिरिअल करताना तर तिला अजय देवगण यांच्या ‘सिंघम रिटर्न्स’मध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली होती. परंतु तिने त्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. त्यानंतर ती भूमिका करीना कपूरने साकारली.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

मृणाल ठाकुर – तसं पाहिलं तर सध्या मृणाल ठाकुर अनेक चित्रपटांत काम करत आहे, परंतु एक वेळ अशी होती की ज्यावेळी तिने अनेक चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या होत्या. आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ मध्ये देखील काम करण्याची आयती आलेली संधी तिने स्वीकारली नाही. त्यावेळेस मृणाल ‘कुमकुम भाग्य’ मध्ये काम करत होती. सोशल मीडियावर मृणालचा बराच मोठा चाहता वर्ग आहे, याच कारणामुळे तिला चित्रपटाच्या ऑफर्स मिळाल्या होत्या.