अंगाला अंग भिडविणारी दृश्ये करण्याची तयारी नसल्...

अंगाला अंग भिडविणारी दृश्ये करण्याची तयारी नसल्याने या टी. व्ही. कलावतींनी वेब सिरीज नाकारल्या (These TV Actresses Rejected Offers Of Web Series : They Were Not Prepared To Do Intimate Scenes)

ओटीटी मंच, हा आता टी. व्ही. उद्योगाला पर्याय म्हणून पुढे येत चालला आहे. यामध्ये बॉलिवूड आणि टी. व्ही. इंडस्ट्रीजमधील नामवंत कलाकार काम करू लागले आहेत. कित्येक अभिनेत्रींनी इथे अंगाला अंग भिडविणारी दृश्ये (इंटिमेट सीन्स) देऊन रातोरात प्रसिद्धी मिळवली आहे. काही बाणेदार अभिनेत्रींनी अशा सलगी दाखविणाऱ्या दृश्यांची तयारी नसल्याचे कारण सांगून वेब सिरीजची कामे साफ नाकारली आहेत.

अदा खान

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

‘नागीण’ या मालिकेतून चांगलीच लोकप्रियता अदा खानने मिळवली. पण तिने नुकताच एका मुलाखतीमधून खुलासा केला की, तिला बोल्ड वेब सिरीजच्या बऱ्याच ऑफर्स आल्या होत्या. पण त्यांचे धाडसी विषय आणि शृंगारिक दृश्ये करण्याची मागणी न पटल्याने तिने वेब सिरीज नाकारल्या.

एरिका फर्नांडिस

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

कसौटी जिंदगी की २ आणि ये रिश्ते है प्यार के; या मालिकांमधून एरिका फर्नांडिसने चांगलेच नाव कमावले. पण ते गमावण्याच्या धास्तीने तिने वेब सिरीजच्या ऑफर्स नाकारल्या. या सिरीजमध्ये शृंगारिक दृश्ये देण्याची मागणी होती, म्हणून आपल्याला त्या नकोशा झाल्या, अशी कबुली एरिकाने दिली आहे.

गौहर खान

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

टेलिव्हिजन ते बॉलिवूड या क्षेत्रात अभिनय गाजवलेली अभिनेत्री आहे गौहर खान. तिने वेब सिरीज्‌मध्ये देखील काम केलं आहे. पण ‘बेस्ट सेलर’ या सिरीज्‌पूर्वी तिला जेवढ्या ऑफर्स आल्या होत्या, त्या सर्व धाडसी विषयांच्या होत्या. त्यामध्ये जी समीप दृश्ये करायची होती, त्याबाबत गौहरची मानसिक तयारी नसल्याने तिने ऑफर्स नाकारल्या.

उर्फी जावेद

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

बिग बॉस ओटीटी या कार्यक्रमातून उर्फी जावेद प्रसिद्धीच्या झोतात आली. उठपटांग कपडे घातल्याने ती नेहमीच ट्रोल होत आली आहे. आपली बोल्ड मुक्ताफळे उधळण्यात आणि चित्रविचित्र कपडे घालून चर्चेत राहण्याचा भलेही उर्फीला सोस आहे. पण बोल्ड सीन्स असलेले वेब सिरीजचे कार्यक्रम तिने साफ नाकारले आहेत.