टीव्हीवर आईचे पात्र साकारण्यापेक्षा या अभिनेत्र...

टीव्हीवर आईचे पात्र साकारण्यापेक्षा या अभिनेत्रींनी भूमिका नाकारत सोडल्या मालिका(These TV Actresses Refused to Play Role of Mother on Screen and Quit the Serial)

टीव्ही मालिकांमध्ये दिसलेल्या अनेक अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो चाहत्यांची मने जिंकली. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या भूमिकांमुळे घरोघरी ओळखल्या जातात, या अभिनेत्रींना प्रत्येक पात्र उत्तमरित्या साकारायला आवडते, तर अशाही काही अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या आवडीनुसार कामे करतात. जर त्यांना एखादी भूमिका आवडत नसेल तर त्या ती साकारण्यास स्पष्टपणे नकार देऊन त्या मालिकेपासून दूर होतात. ऑनस्क्रीन आईच्या भूमिकेबद्दल बोलायचे झाल्यास, अनेक अभिनेत्री ती भूमिका सहजतेने करण्यास तयार आहेत, तर काही अभिनेत्रींनी अशी भूमिका करण्यास स्पष्टपणे नकार दिला आणि त्या शोमधून काढता पाय घेतला.

निया शर्मा

 नागिन या मालिकेपूर्वी अभिनेत्री निया शर्मा ‘जमाई राजा’ या हिट मालिकेमध्ये दिसली होती. या मालिकेत निया मुख्य भूमिका साकारायची. पण मालिकेत लीप घेण्यात आला आणि तेव्हाच्या कथेच्या गरजेनुसार नियाला पडद्यावर आईची भूमिका साकारावी लागणार होती. पण ती साकारण्यास नियाने स्पष्टपणे नकार दिला होता. पडद्यावर आई होण्यापेक्षा मालिकेपासून वेगळे होणे चांगले असे नियाला वाटले आणि तिने ती मालिका सोडली.

जस्मिन भसीन

टीव्हीची सुंदर अभिनेत्री आणि बिग बॉस फेम जस्मिन भसीन हिनेही पडद्यावर आईची भूमिका साकारण्यास नकार दिला आहे. त्यासाठी अभिनेत्रीने ‘दिल तो हॅप्पी है जी’ ही मालिका सोडली होती. मालिकेच्या निर्मात्यांना तिने पडद्यावर आईची भूमिका करावी अशी इच्छा होती, परंतु अभिनेत्री त्यासाठी तयार नव्हती.

ऐश्वर्या शर्मा

‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत टीव्ही अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा मुख्य भूमिकेत दिसत आहे, मात्र ऐश्वर्यानेही एका मालिकेत आईची भूमिका साकारण्यास नकार दिला होता. ‘मेरी माँ दुर्गा’ या मालिकेत तिला आईची भूमिका साकारण्याची ऑफर आली होती, पण अभिनेत्रीने नकार देत मालिकेपासून दूर राहणे पसंत केले. 

सुरभि चंदना

टीव्ही अभिनेत्री आणि नागिन फेम सुरभी चंदना हिनेही पडद्यावर आई होण्यास नकार दिला होता. ‘इश्कबाज’ या मालिकेदरम्यान निर्मात्यांनी सुरभीला पडद्यावर आईची भूमिका करण्यास सांगितले होते, परंतु अभिनेत्रीने त्यास विरोध केला, आणि ती मालिका अर्धवट सोडली.

मीरा देवस्थळे

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘उडान’मध्ये चकोरची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री मीरा देवस्थळे हिने केवळ आईची भूमिका साकारायची नव्हती म्हणून ती मालिका सोडली. त्यावेळी तिने सांगितले की मी स्वत: 22 वर्षांची आहे मग मालिकेत एका 18 वर्षांच्या मुलीची आई कशी काय साकारु शकते.

दृष्टी धामी

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रींपैकी एक असलेल्या दृष्टी धामीनेही पडद्यावर आईची भूमिका साकारावी लागू नये यासाठी मालिका सोडली होती. अभिनेत्रीने स्वतः सांगितले होते की, तिने ‘एक था राजा एक थी रानी’ ही मालिका सोडली कारण त्यावेळी ती पडद्यावर आईची भूमिका साकारण्यास तयार नव्हती.