आपल्या पतीविरोधात या अभिनेत्रींनी उठवला होता आव...

आपल्या पतीविरोधात या अभिनेत्रींनी उठवला होता आवाज (These TV Actresses Have Openly Raised Their Voice Against Their Husbands, You Will be Surprised to Know The Name)

आपल्या देशात महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. केवळ सामान्य महिलाच नाही तर ग्लॅमर इंडस्ट्रीशी संबंधित अनेक अभिनेत्रीही पतीकडून कौटुंबिक हिंसाचार आणि अत्याचाराच्या बळी पडल्या आहेत. इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी केवळ घरगुती हिंसाचाराला विरोधच केला नाही, तर त्यांनी आपल्या पतीच्या अत्याचाराविरोधात उघडपणे आवाज उठवला होता.

चारू असोपा

टीव्ही अभिनेत्री चारू असोपा आणि तिचा पती राजीव सेन यांच्यातील भांडण अनेकदा मीडियात चर्चेत आले आहे. एका मुलाखतीत अभिनेत्रीने आपला पती राजीव विरोधात सांगितले होते की, तो माझ्यावर संशय घेतो आणि अनेकदा शिवीगाळ करत मारहाणसुद्धा करतो. सध्या दोघांमधील वाद घटस्फोटापर्यंत पोहचले आहेत.

निशा रावल

अभिनेत्री निशा रावल आणि तिचा पती करण मेहरा यांच्यातील भांडण जगजाहीर आहे. निशा 2021 मध्ये करण मेहरापासून विभक्त झाली. तिने मीडियासमोर करण मेहरावर घरगुती हिंसाचारासोबतच  विवाहबाह्य संबंध असल्याचेही आरोप केले होते. 

श्वेता तिवारी

टीव्हीवरील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या अभिनेत्री श्वेता तिवारीची दोन्ही लग्न अयशस्वी ठरली. श्वेताचा दुसरा पती अभिनव कोहलीने श्वेता आपल्या मुलाला भेटू देत नाही असा आरोप केला होता. त्यानंतर श्वेताने देखील सोशल मीडियावर सार्वजनिकपणे आपल्या पतीच्या चुकीच्या कृत्यांचा आणि त्याचा खरा चेहरा उघड करणारा व्हिडिओ सर्वांसमोर आणला.

रश्मी देसाई

टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई घटस्फोटानंतर पती नंदिश संधूपासून विभक्त झाली. तिनेही पतीच्या अत्याचाराविरोधात उघडपणे आवाज उठवला होता. अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की, माझे माझ्या पतीसोबतचे नाते खूप विचित्र होते, मी या नात्यात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राहू शकली नाही आणि वेगळी झाली.

दलजीत कौर

टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर आणि शालीन भानोत यांची प्रेमकहाणी खूप रंजक पद्धतीने सुरू झाली, पण लग्नानंतर त्यांच्या नात्यात कटुता वाढू लागली. दलजीतने पती शालीनवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. जेव्हा ‘बिग बॉस 16’ मध्ये शालीनने दलजीतला त्याची सर्वात चांगली मैत्रीण म्हटले तेव्हा अभिनेत्रीने ट्विट करत म्हटले की, मुलासाठी एकमेकांना भेटणे म्हणजे आपण मित्र आहोत असे नाही.

मंदना करीमी

मंदाना करीमीने कंगना रणावतच्या ‘लॉकअप’ शोमध्ये आपला  माजी पती गौरव गुप्तावर गंभीर आरोप केले होते. मंदाना म्हणाली होती की, विवाहित असूनही पतीचे इतर महिलांसोबत संबंध होते. पतीच्या या वागण्याला कंटाळून मंदानाने २०२१ मध्ये पतीपासून घटस्फोट घेतला होता.