सर्वगुण संपन्न आहेत टीव्हीवरील या अभिनेत्री, को...

सर्वगुण संपन्न आहेत टीव्हीवरील या अभिनेत्री, कोणी आहे डान्सर तर कोण आहे नॅशनल लेव्हलची रायफल शूटर (These TV Actresses Are Multi-Talented, Some Are Dancers And Some Have Been National Level Rifle Shooters)

छोट्या पडद्यावरील कलाकार आपल्या अभिनयाच्या जोरावर घराघरात आपली खास ओळख निर्माण करत आहेत. टीव्ही मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून यश मिळविणाऱ्या या कलाकारांमध्ये काही कलाकार असेही आहेत ज्यांनी अभिनयाव्यतिरिक्त अन्य क्षेत्रातही प्रभुत्व मिळवले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टीव्ही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्या केवळ अभिनयातच नाही तर इतर क्षेत्रातही निष्णात आहेत.

दिव्यांका त्रिपाठी

 प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘ये है मोहब्बतें’मध्ये ईशी माँची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीच्या अभिनयाबद्दल तर तुम्हाला माहिती असेलच, पण दिव्यांका रायफल शूटींगमध्येही खूप हुशार आहे. तसेच ती भोपाळ रायफल शूटिंग असोसिएशनचीही सदस्य आहे. एवढेच नाही तर दिव्यांका त्रिपाठीने दिल्लीतून गिर्यारोहणाचा कोर्सही केला आहे.

तेजस्वी प्रकाश

 प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश अभिनयात जितकी हुशार आहे तितकीच ती गायनातही निपुण आहे. तेजस्वीने सलग ४ वर्षे शास्त्रीय गायन शिकले आहे. तेजस्वीला सितार देखील वाजवता येते हे फार कमी लोकांना ठाऊक आहे.

सुम्बुल तौकीर खान

 सध्या ‘इमली’ या मालिकेत आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात घर करणारी  अभिनेत्री सुम्बूल तौकीर खान अभिनयासोबतच नृत्यातही निपुण आहे. ती एक अतिशय उत्कृष्ट नृत्यांगना आहे. ती दररोज आपल्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेकवेळा तिने ‘संडे विथ स्टार परिवार’मध्ये आपल्या नृत्याची झलक दाखवली आहे.

भारती सिंह

 आपल्या धमाकेदार विनोदाने लोकांना हसवणाऱ्या भारती सिंगचे चाहते जगभर पसरले आहेत. भारती उत्तम कॉमेडियन तर आहेच पण ती राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज देखील आहे. भारतीने रायफल शूटिंगमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व केले आहे. एवढेच नाही तर ती एक उत्तम डान्सर देखील आहे.

प्रणाली राठौर

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अक्षराची भूमिका साकारणारी प्रणाली राठौर या मालिकेत गायिका असल्याचे दाखवले आहे. पण खऱ्या आयुष्यातही प्रणाली खूप चांगली गायिका आहे. ‘संडे विथ स्टार परिवार’मध्ये ती अनेकदा गाणे गाताना दिसते. 

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम