टेलिव्हिजन मध्ये आघाडीवर असलेल्या सुंदरींना बी-...

टेलिव्हिजन मध्ये आघाडीवर असलेल्या सुंदरींना बी-ग्रेड चित्रपटात कामे मिळाली होती : अर्चना पूर्ण सिंह त्यामध्ये सामील (These Top T.V. Actress Have Worked In B-Grade Films : Archana Puran singh Also Included In The List)

टेलिव्हिजनने नट-नटयांच्या लोकप्रियतेने कळस गाठला आहे. पण मजेची गोष्ट अशी की टेलिव्हिजन वरील लोकप्रिय सितारे जेव्हा चित्रपटात आले. तेव्हा फार लोकप्रियता अथवा कामे मिळवू शकले नाहीत. कपिल शर्मा आणि राम कपूर यांचे या संदर्भात उदाहरण देता येईल. तेच काही अभिनेत्रींच्या बाबतीत सांगता येईल. अशा काही सुंदरी आहेत , ज्या बी-ग्रेड चित्रपटात गाजल्या नाहीत, पण टेलिव्हिजनवर येताच लोकप्रिय झाल्या.

उर्वशी ढोलकिया – ‘कसौटी जिंदगी की’ या लोकप्रिय मालिकेत खलनायिकेची भूमिका गाजवलेल्या उर्वशीने  बी-ग्रेड चित्रपटातून आधी मनोरंजन सृष्टीत पदार्पण केलं. ‘स्वप्नम’ हे त्या चित्रपटाचे नाव. या  चित्रपटात उर्वशीने बरीच बोल्ड दृश्ये दिली होती.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
रश्मी देसाई – आपल्या दमदार अभिनयाने रश्मीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. ‘उतरन’ या मालिकेत ती जास्त गाजली. नंतर ‘नच बलिये’ तथा ‘बिग बॉस’ या रिऍलीटी शो मधून तिनं नाव कमावले. पण टी.व्ही.च्या पडद्यावर गाजण्यापूर्वी रश्मीने काही भोजपुरी चित्रपटांमधून उमेदवारी केली होती. अन ‘ये लम्हे जुदाई के’ या  बी-ग्रेड हिंदी चित्रपटातही ती दिसली होती.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

अर्चना पुरण सिंह – जाने  भी दो यारो, श्रीमान श्रीमतीजी, कॉमेडी सर्कस, द कपिल शर्मा शो; अशा लोकप्रिय टी.व्ही. कार्यक्रमातून नाव कमावलेल्या अर्चना पुरण सिंहच्या नशिबी आधी दुय्यम दर्जाचे चित्रपट आले होते.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
दिशा वकानी – टेलिव्हिजन वरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत दयाबेनची भूमिका करून लोकप्रिय झालेल्या दिशा वकानीला  देखील टी.व्ही.च्या आधी दुय्यम दर्जाच्या चित्रपटात काम करावे लागले होते. ‘कमसीन -द अनटच्ड’ या चित्रपटातून तिने आपलं करिअर सुरु केलं. आज भलेही दिशा ‘तारक मेहता’ मध्ये नाही पण तिची जागा अद्याप कोणी घेतलेली नाही.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम