एकेकाळी घराघरात प्रसिद्ध असलेल्या या कलाकारांकड...

एकेकाळी घराघरात प्रसिद्ध असलेल्या या कलाकारांकडे सध्या नाही कोणतेच काम (These Top Actors of TV do not have Work Today, Once They Were Famous in by Playing Lead Roles)

अनेक टीव्ही कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अशी काही जादू केली आहे ज्यामुळे आजही प्रेक्षक त्यांना पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अनेक कलाकारांनी आपल्या मालिकांमध्ये दमदार अभिनय करुन प्रत्येक घराघरात स्थान मिळवले. मात्र त्यातील काही लोकप्रिय कलाकार सध्या मालिकांमध्ये दिसत नाहीत. 

दिव्यांका त्रिपाठी

‘बनू मैं तेरी दुल्हन’ या मालिकेतून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आज टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. दिव्यांकाने अनेक टीव्ही मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, पण सध्या दिव्यांका आपला कौटुंबिक वेळ एन्जॉय करत आहे. सध्या तिच्याकडे कोणताही प्रोजेक्ट नाही.

रश्मी देसाई

‘उतरन’ आणि ‘दिल से दिल तक’ यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारून लोकप्रियता मिळवलेली सुंदर अभिनेत्री रश्मी देसाईकडे सध्या कोणतेही काम नाही. अभिनेत्रीने सर्वात शेवटी ‘नागिन 6’ मध्ये पाहुणी कलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर ती कोणत्याच प्रोजेक्टमध्ये दिसली नाही.

पर्ल व्ही पुरी

‘नागिन’ आणि ‘बेपनाह प्यार’ सारख्या मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत दिसलेला टीव्हीवरील हँडसम अभिनेता पर्ल व्ही पुरीकडे सध्या कोणतीही मालिका नाही. पर्ल टीव्हीवरून जवळजवळ गायब झाला आहे, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून तो सतत चाहत्यांशी जोडलेला असतो.

शिवांगी जोशी

टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम शिवांगी जोशीने मालिकेतून खूप नाव आणि प्रसिद्धी मिळवली, परंतु ही मालिका सोडल्यानंतर तिला आजपर्यंत कोणताही नवीन प्रोजेक्ट मिळालेला नाही. ती शेवटची ‘खतरों के खिलाडी’मध्ये दिसली होती.

मोहसीन खान

मोहसीन खानने टीव्ही सीरियल ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये मुख्य भूमिका साकारली होती.  आपल्या दमदार अभिनयाने त्याने सर्वांची मने जिंकली. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येक घराघरात लोकप्रिय झालेल्या मोहसीन खानकडे सध्या कोणतेही काम नाही. तो एका चांगल्या प्रोजेक्टच्या प्रतीक्षेत आहे.

करण सिंग ग्रोव्हर

बिपाशा बसूचा नवरा आणि सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेता करण सिंग ग्रोव्हर सध्या पालकत्वाचा आनंद घेत आहे. करण सिंग ग्रोवर शेवटचा ‘कसौटी जिंदगी की २’ मध्ये दिसला होता. तेव्हापासून हा अभिनेता पडद्यावरून गायब आहे.

करण पटेल

‘ये है मोहब्बतें’मध्ये मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता करण पटेल अनेक मालिकांमध्ये दिसला असून तो आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. बऱ्याच दिवसांपासून  त्याच्याकडे कोणतीही मालिका नाही.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम