धाडसी कामुक दृश्ये देण्यास या टी. व्ही. कलावतीं...

धाडसी कामुक दृश्ये देण्यास या टी. व्ही. कलावतींनी नकार दिला… (These T.V. Actresses Refused To Do Intimate Scenes)

टी. व्ही. च्या छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या बऱ्याच गुणी कलावतींची अशी मानसिकता आहे की, आपल्याला इथे चांगला अभिनय करायचा आहे. धाडसी दृश्ये देऊन नाव कमावायचे नाहिये. पण आजकाल असं दिसून येतं की, काही मालिका आणि वेब सिरीज्‌मधून चुंबन आणि आलिंगनाची दृश्ये घुसडली जातात. काही कलाकार अशी कामुक दृश्ये देतात. पण काही कलावती अशा आहेत की, ज्यांनी अशा धाडसी, कामुक दृश्ये देण्यास साफ नकार दिला आहे.

हिबा नवाब

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

‘जिजाजी छत पर कोई है’ या मालिकेची नटी हिबा नवाब आपल्या संस्कृतीच्या विरोधात जाऊ इच्छित नाही. एका मुलाखतीत हिबाने या विषयी आपली कैफियत मांडली. ती म्हणाली की, मी एका मुस्लीम परिवारातील मुलगी आहे. आमची एक वेगळी संस्कृती आहे. मी छोट्या अथवा मोठ्या पडद्यावर बिकिनी घालणार नाही किंवा अंगप्रदर्शनही करणार नाही. हा माझा निर्णय पक्का आहे.

तान्या शर्मा

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

‘ससुराल सिमर २’ मधून नावारूपास आलेल्या तान्या शर्माने कित्येक वेब सिरीज्‌च्या ऑफर्स धुडकावून लावल्या. कारण त्यातून बोल्ड सीन्स देण्यास सांगण्यात आले होते. एका मुलाखतीत या नटीने कबूल केलं की, मी कामुक आणि धाडसी दृश्यांची मागणी करणाऱ्या वेब सिरीज्‌च्या ऑफर्स गमावून बसले आहे. मी स्वतःसाठी एक मर्यादा आखून घेतली आहे. अन्‌ सध्या तरी ही मर्यादा ओलांडण्याची माझी तयारी नाही. कोणतीही कामुक दृश्ये मी सहजपणे देऊ शकणार नाही. म्हणून मी अशा भूमिका करणार नाही.

जन्नत झुबेर

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

जन्नत झुबेर सोळाव्या वर्षीच टी. व्ही. वर आली. तिने ‘तू आशिकी’ मध्ये पंक्ती ही भूमिका केली. त्यावेळी एक दृश्य देण्यास तिने नकार दिला होता. ज्यामध्ये सहकलाकार ऋत्विक अरोराला मिठ्या मारायच्या होत्या. पण निर्माते-दिग्दर्शकांनी ते दृश्य देण्यासाठी जन्नतवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिच्या आईने त्यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले.

कृतिका सेंगर

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

‘कसम तेरे प्यार की’ मालिकेची अभिनेत्री कृतिका सेंगरने छोट्या पडद्यावर रोमॅन्टिक दृश्य देण्यास नकार दिलेला आहे. या मालिकेत तिला सहकलाकार शरद मल्होत्राशी एक रोमॅन्टिक दृश्य चित्रित करायला सांगण्यात आलं. पण तिने नकार दिला. तरी पण हट्टाला पेटून तिच्या जागी ‘डबल’चा वापर करून त्यामध्ये कृतिकाचे क्लोज अप शॉट्‌स मिसळून दिग्दर्शकाने ते दृश्य पडद्यावर दाखवलेच.

माही विज

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

‘बालिका वधू’ मालिकेत माही विजने रुस्लान मुमताजशी एक रोमॅन्टिक सीन चित्रित केला, पण त्यात ती चांगलीच अवघडली. त्यामुळे दिग्दर्शकांनी तो सीन मालिकेतून काढूनच टाकला.

सोनारिका भदौरिया

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

टी. व्ही. ची रुपसुंदर अभिनेत्री सोनारिका भदौरियाने देखील या छोट्या पडद्यावर कामुक दृश्य देण्यास नकार दिलेला आहे. ‘पृथ्वी – वल्लभ’ या मालिकेत आपला सहकलाकार आशिष सोबत चुंबन दृश्य देण्याची मागणी तिच्याकडे करण्यात आली. तेव्हा तिने हे दृश्य देण्यास साफ नकार दिला.