साऊथकडील चित्रपटांत या कलाकारांचे नाणे खणखणीत व...

साऊथकडील चित्रपटांत या कलाकारांचे नाणे खणखणीत वाजले असले तरी बॉलिवूडमध्ये टिकाव लागला नाही (These Superstars Are Hit in South Films, But Luck Did Not Supported Them in Bollywood)

पूर्वी बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड चित्रपटांचा एक दबदबा असायचा पण आता बॉक्स ऑफिसवर यश मिळवण्यात बॉलिवूड चित्रपट कुठेतरी मागे पडू लागले आहेत. सध्या अनेक मोठमोठ्या कलाकारांचे चित्रपट फ्लॉप होत आहेत. शिवाय आता सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षक फिल्म स्टार्सच्या विरोधात प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे अनेक कलाकारांना बहिष्काराच्या मागणीचा सामना करावा लागत आहे. अशातच कुठेतरी साऊथकडील चित्रपट हिंदी चित्रपटांवर भारी पडत असल्याचे दिसून येते. साऊथच्या सुपरस्टार्सनी सुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सुरुवात केली आहे. पण त्यांची साऊथ चित्रपटांसारखी जादू बॉलिवूडमध्ये पाहायला मिळत नाही.

रश्मिका मंदना

‘पुष्पा’ चित्रपटात श्रीवल्लीची भूमिका साकारून लोकांना घायाळ करणारी सुंदर अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ‘गुडबाय’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रश्मिकाही दाक्षिणात्य चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री आहे, पण ती बॉलिवूडमध्येही आपला जम बसवते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

राम चरण

साऊथच्या सुपरस्टार्समध्ये राम चरणच्या नावाचाही समावेश होतो. पण बॉलिवूडमध्ये त्याचा टिकाव लागला नाही. 2013 मध्ये राम चरणने ‘जंजीर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट म्हणजे 1973 मध्ये आलेल्या अमिताभ बच्चनच्या ‘जंजीर’ चित्रपटाचा रिमेक होता.या चित्रपटात प्रियांका चोप्रा, संजय दत्त, प्रकाश राज, अतुल कुलकर्णी आणि माही गिल यांसारख्या कलाकारांनी काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला.

विजय देवरकोंडा

साऊथकडील सुपरस्टार विजय देवरकोंडाने अलीकडेच ‘लायगर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडेने काम केले होते. हा चित्रपट बॉलिवूडच्या प्रेक्षकांनी नाकारला. त्यामुळे लायगरला 2022 मधील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट म्हटले जाऊ लागले.

प्रभास

साऊथचा ब्लॉक बस्टर चित्रपट ‘बाहुबली’ ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती आणि या चित्रपटाद्वारे प्रभास चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला होता. बाहुबलीच्या यशानंतर प्रभासने ‘साहो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, मात्र हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. या चित्रपटात प्रभाससोबत श्रद्धा कपूर दिसली होती.

सूर्या

साऊथचा सुपरस्टार सुर्याने 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या राम गोपाल वर्माच्या ‘रक्त चरित्र 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. इतर साऊथ चित्रपटांप्रमाणेच हा देखील अॅक्शनने भरलेला चित्रपट होता, पण प्रेक्षकांना मात्र तो फारसा आवडला नाही. त्यानंतर सुर्याने कधीच बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले नाही. आता तो फक्त तामिळ चित्रपटांमध्ये काम करतो.

पूजा हेगड़े

साऊथच्या चित्रपटांमधील सुंदर अभिनेत्री पूजा हेगडेने एकापेक्षा एक उत्तम चित्रपटात काम केले आहे. साऊथच्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या पूजा हेगडेने ‘मोहनजो दारो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात ती अपयशी ठरली. या चित्रपटात पूजासोबत हृतिक रोशन मुख्य भूमिकेत होता.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम