स्वयंपाकघरात दडलंय आरोग्याचं रहस्य (These Kitch...

स्वयंपाकघरात दडलंय आरोग्याचं रहस्य (These Kitchen Utensils Can Lead You To Good Health)


आपल्या निरोगी आरोग्याचे रहस्य आपल्या स्वयंपाकघरातच दडलेले असते. स्वयंपाकघर स्वच्छ, सुंदर अन् व्यवस्थित असेल तर घरातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य उत्तम राहतेच शिवाय स्वयंपाकघरात काम करणार्‍या गृहिणीच्या कार्यपद्धतीवरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. यासाठी काय करावे, हे जाणून घेऊया.
* स्वयंपाकघरातील फरशीवर तेल, तूप किंवा दूध पडल्यास त्यावर कोरडे पीठ शिंपडा आणि वर्तमानपत्राने स्वच्छ करा. त्यामुळे तेलकटपणा आणि डाग पूर्णपणे साफ होतील.
* साफसफाईसाठी कधीही अमोनिया आणि ब्लीच एकत्र मिसळू नका. त्यातून हानिकारक धूर उत्सर्जित होतो, जो आरोग्यास हानिकारक असतो.
* अचानक काही कामासाठी घराबाहेर पडावे लागले आणि खरकटी भांडी धुवायला वेळ नसेल तर सिंकचा ड्रेन बंद करून त्यात डिटर्जंट असलेले गरम पाणी टाकून खरकटी भांडी ठेवा. यामुळे भांड्यांवरचे खरकटे सुकणार नाही.
* स्वयंपाकघरातील माशांची दुर्गंधी दूर करण्यासाठी बटाट्याचे किंवा सफरचंदाचे एक किंवा दोन तुकडे तळून घ्या. वास निघून जाईल.
* काचेच्या भांड्याला येणारा वास दूर करण्यासाठी एक माचिसची काडी पेटवून बरणीच्या आत ठेवा आणि बरणीचे झाकण बंद करून काही मिनिटे सोडा. नंतर साबण आणि कोमट पाण्याच्या द्रावणाने धुवा. वास निघून जाईल.
* भाजी कापण्याच्या बोर्डच्या दातांवरील गंज साफ करण्यासाठी त्यावर बेकिंग सोडा टाका आणि ब्रशने साफ करा. बोर्ड चमकेल.
* सुरीची तीक्ष्णता राखण्यासाठी ती वापरल्यानंतर, लगेच धुवा आणि पुसून टाका. नंतर कागदात गुंडाळून ठेवा.

* कांदे आणि लसूण कापल्यानंतर चाकूला येणारा त्यांचा वास दूर करण्यासाठी चाकूवर लिंबू चोळा. वास निघून जाईल.
* कचर्‍याच्या डब्यातून येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी त्यात लिंबाच्या साली टाकून ठेवा.
* जेवण बनवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्या. त्याचप्रमाणे कच्च्या भाज्या, मासे, चिकन, मटण साफ केल्यानंतर हात स्वच्छ धुवून घ्यावे. जेवण बनवायला घेण्यापूर्वी स्वयंपाकघरातील प्लॅटफॉर्म डिसइंफेक्टेड क्लीनरने साफ करून घ्या.

* भाज्या, फळं वापरण्यापूर्वी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. कच्च्या भाज्या वा इतर कोणतेही कच्चे पदार्थ शिजवलेल्या अन्नापासून दूर ठेवा.
* गुळ, साखर वा अन्य गोड पदार्थांना मुंग्या येऊ नयेत म्हणून त्या ठिकाणी एरंडेल तेल लावावे.
* मांस किंवा चिकनसारखे ’नॉन-व्हेज’ अन्न चांगले शिजवा. अन्न ताबडतोब खायचे नसेल किंवा जेवायला बराच वेळ लागणार असेल तर अन्न शिजवल्यानंतर तासाभरात थंड करून फ्रीजमध्ये ठेवावे.


* शिजवलेले अन्न एकापेक्षा जास्त वेळा गरम करू नका. फ्रीजमधून बाहेर काढलेले अन्न पुन्हा फ्रीजमध्ये ठेवणे टाळा. जर अन्न जास्त प्रमाणात तयार केले असेल तर ते आवश्यक तेवढे गरम करावे. अन्न हवाबंद बॉक्समध्ये किंवा झिप लॉकमध्ये ठेवा. जेवण लवकर खराब होणार नाही. तापमान फक्त 37 फॅरेनहाइट किंवा त्यापेक्षा कमी सेट करा. डीप फ्रिजर 0 फॅरेनहाइट वर ठेवा.
* भाज्या कापण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कटिंग बोर्डवर बॅक्टेरिया वाढण्याचा सर्वाधिक धोका असतो. म्हणून, त्याची स्वच्छता आणि देखभाल यावर विशेष लक्ष द्या. कटिंग बोर्डवर मांस, चिकन किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या मांसाहारी वस्तू कापल्यानंतर, गरम पाण्यात 1 चमचा क्लोरीन ब्लीच टाकून, ते पूर्णपणे स्वच्छ करा.

* किटक आणि पतंगांना किचनपासून दूर ठेवण्यासाठी संत्र्याची वाळलेली साले खूप उपयुक्त ठरतात. यासाठी संत्र्याची वाळलेली साले कापडात गुंडाळून 3-4 ठिकाणी ठेवा.
* जर तुम्हाला मुंग्यांपासून सुटका हवी असेल तर बोरॅक्स पावडरमध्ये हळद मिसळा आणि प्रभावित भागावर ठेवा. मुंग्या पळून जातील.
* झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी बोरिक पावडरमध्ये दूध आणि चिमूटभर साखर मिसळून पेस्ट तयार करा आणि झुरळाच्या भागावर चोळून लावा. झुरळांपासून मुक्ती मिळवा.
* भांडी घासण्याकरीता वापरण्यात येणारा स्पंज एका आठवड्यापेक्षा जास्त काळ वापरू नका. तसेच भांडी साफ केल्यानंतर तो कोरडा करून ठेवा.
* भांडी साफ करण्यासाठी वापरलेला स्पंज वापरू नका. भांडी साफ केल्यानंतर, त्यांना कोरडे करण्याची खात्री करा.