नवऱ्याने केलेली मारहाण आणि हिंसाचार सोसलेल्या अ...

नवऱ्याने केलेली मारहाण आणि हिंसाचार सोसलेल्या अभिनेत्री (These Famous TV Actresses Became Victims of Domestic Violence And Physical Torture by Their Husbands)

छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम करून लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सुरभी तिवारीने पती प्रवीण कुमार आणि सासरकडच्या मंडळींच्या छळाला कंटाळून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुरभीने एका मुलाखतीत, तिचा नवरा आणि सासरचे लोक तिचा छळ करत असल्याचे सांगितले. तिने याबाबत मुंबई पोलिसांकडे तक्रारही केली आहे. मात्र, पतीने छळाला बळी पडलेली सुरभी ही एकमेव टीव्ही अभिनेत्री नाही. याआधीही अनेक अभिनेत्रींना त्यांच्या पतीकडून छळ, कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. चला जाणून घेऊया अशा टीव्ही अभिनेत्रींबद्दल ज्यांनी त्यांच्या पतीच्या छळाला कंटाळून घटस्फोट घेतला.

चाहत खन्ना

टीव्ही अभिनेत्री चाहत खन्नाने खूप कमी वयातच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, पण तिचा हा निर्णय चुकीचा ठरला. चाहतने पहिले लग्न भरत नरसिंघानीसोबत केले होते, पण ते लग्न जेमतेम वर्षभर टिकले. चाहतने तिचा पती शारीरिक छळ करत असल्याचा आरोप केला होता. यानंतर तिने फरहान मिर्झासोबत लग्न केले, पण तिथेही तिला पतीच्या छळाला सामोरे जावे लागले. आता दोन्ही पतींपासून विभक्त होऊन ती एकटीच आपल्या मुलींचे संगोपन करत आहे.

श्वेता तिवारी

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीनेही अगदी कमी वयात राजा चौधरीसोबत लग्न केले, पण लग्नानंतर काही वर्षांनी तिच्या पतीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे तिचे म्हणणे होते. राजा श्वेताला त्यांची लहान मुलगी पलक समोरही मारहाण करायचा. सतत होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून श्वेताने त्याला घटस्फोट दिला आणि घटस्फोटाच्या काही वर्षांनी तिने अभिनव कोहलीसोबत लग्न केले, पण तिचे दुसरे लग्नही फार काळ टिकले नाही. आता ती आपल्या दोन मुलांचे संगोपन एकटी करत आहे.

निशा रावल

करण मेहरा आणि निशा रावल हे दोघे टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक होते. पण त्यांच्या हसत्या खेळत्या कुटुंबाला कोणाची तरी नजर लागली आणि त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला.  गेल्या वर्षीच निशा रावल आणि करण मेहरा यांच्यातील भांडण जगासमोर आले. डोक्‍यावर झालेली जखम दाखवत निशाने पतीने आपले डोके भिंतीवर आपटल्याचा आरोप केला होता. निशाने पतीविरुद्ध घरगुती हिंसाचार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. निशा तिच्या मुलासोबत पतीपासून वेगळी राहत आहे.

रश्मि देसाई

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाईने तिचा सहअभिनेता नंदिश संधू सोबत लग्न केले, पण लग्नाच्या चार वर्षानंतर दोघे वेगळे झाले. रश्मीने तिच्या पतीवर शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला होता. पतीपासून विभक्त झाल्यानंतर पुन्हा रश्मी प्रेमात पडली, पण तिथेही तिची फसवणूक झाली. रश्मी अजूनही खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे.

दलजीत कौर

दलजीत कौरचे नाव टीव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणून घेतले जात असले तरी आहे तिचे वैवाहिक जीवन काही खास नव्हते. लग्नानंतर काही दिवसांतच दलजीत कौरचा पती शालीन भानोत आणि सासरच्या मंडळींकडून छळ केला जात होता. काही काळ तिने ते सर्वकाही सहन केले, परंतु असह्य झाल्यावर तिने पतीपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

रुचा गुजराती

रुचा गुजरातीलाही आपल्या वैवाहिक जीवनात छळाचा सामना करावा लागला होता. तिने मितुल संघवीशी लग्न केले होते, मात्र लग्नानंतर पतीने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तिचा नवराच नाही तर सासरचे लोकही तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचे तिने सांगितले. सततच्या त्रासाला कंटाळून अभिनेत्रीने घटस्फोट घेऊन पुन्हा दुसरे लग्न केले.

दीपशिखा नागपाल

अभिनेत्री दीपशिखा नागपालने केशव अरोरासोबत पहिले लग्न केले होते, मात्र या लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्या त्रासाला कंटाळून तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. दीपशिखाने तिच्या पतीवर घरगुती हिंसाचार आणि पैशांसाठी छळ केल्याचा आरोप केला होता. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर दीपशिखाने जीत उपेंद्रसोबत दुसरे लग्न केले.