बॉलीवुडच्या या लोकप्रिय स्टार किड्सना अभिनयात अ...

बॉलीवुडच्या या लोकप्रिय स्टार किड्सना अभिनयात अजिबात रस नाहीये (These Famous Star Kids of Bollywood Do Not Want to Make Their Career in Acting)

चित्रपटसृष्टीच्या झगमगत्या आणि ग्लॅमरस दुनियेचा एक भाग होण्याचं बहुतांशी लोकांचं स्वप्न असतं; परंतु फारच कमी लोकांचं हे स्वप्न सत्यात उतरतं. एकीकडे चित्रपटसृष्टीत आपल्याला संधी मिळावी म्हणून स्ट्रगल करणारे लोक आहेत तर याच चित्रपटसृष्टीत असेही काही स्टार किड्‌स आहेत ज्यांना या दुनियेत सहज प्रवेश मिळू शकतो परंतु, त्यांना येथे येण्यात जराही रुची नाही. अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचीच त्यांची इच्छा नाही.

आर्यन खान

बॉलीवुडचे बादशहा शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत, परंतु डेविड लेटरमॅनच्या एका मुलाखतीमध्ये शाहरुखने सांगितले की, आर्यनची सध्या तरी अभिनेता बनण्याची तयारी नाही आहे. आर्यन अमेरिकेमध्ये सिनेमाचा अभ्यास करत असला तरी त्याच्या वडिलांचं असं म्हणणं आहे की तो बॉलीवूडमध्ये फारफार तर लेखक म्हणून करिअर करू शकतो, पण त्याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही.

नव्या नवेली नंदा

महानायक अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील जवळजवळ सर्वच सदस्य बॉलीवूडमध्ये आपलं एक स्थान मिळवून आहेत. अशातच बिग बी यांची नात नव्या नवेली नंदाने चित्रपटांत यावं यासाठी चाहते प्रतिक्षा करत आहेत. परंतु नव्या नंदा आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत चालत आहे आणि अभिनयात करिअर करण्याचा तिचा अजिबात विचार नाही.

आलिया कश्यप

बॉलीवूडमधील सर्वांनाच परिचयाचे असलेले दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप तिच्या बोल्ड फोटोंमुळे कायम चर्चिली जात असते. सध्या आलिया लॉस एंजेलेस येथे शिक्षण घेत आहे. आणि अभिनयामध्ये करिअर करण्याची आता तरी तिची इच्छा दिसत नाहीये.

कृष्णा श्रॉफ

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. परंतु अभिनयाबद्दल बोलायचं तर कृष्णाला अभिनयामध्ये करिअर करायचं नाहीये. एरव्हीही कृष्णा श्रॉफ ही सेलिब्रेटींप्रमाणे मिरवत असते. टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटाणी सोबत तिचं छान बाँडिंग आहे.

शाहीन भट्ट

आलिया भट्टला आज कोण ओळखत नाही. अतिशय कमी वेळात तिने आपल्या अभिनयाची उंची दर्शकांपर्यंत पोहोचवली आहे. आलियाचा खास चाहतावर्ग आहे. तेच आलियाची बहीण शाहीन भट्ट मात्र कोणत्याही प्रकारच्या लोकप्रियतेपासून दूर आहे. शाहीन देखील लेखक आहे. परंतु ती प्रसिद्धीपासून दूर राहणेच पसंत करते. एका यशस्वी अभिनेत्रीची बहीण असूनही शाहीनने अभिनयाचं क्षेत्र न निवडता लेखक बनण्याचा निर्णय घेतला.