बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्री पडल्या होत्या...

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्री पडल्या होत्या लैंगिक शोषणाला बळी..(These Famous Bollywood Actresses Have Become Victims of Sexual Abuse)

‘सेक्रेड गेम्स’या वेबसिरीजमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अभिनेत्री कुब्रा सैतने नुकताच तिच्या आय़ुष्यात घडलेल्या धक्कदायक प्रकाराचा खुलासा केला. तिचे तब्बल अडीच वर्ष लैगिंक शोषण झाले पण ती त्या विरुद्ध काहीही करु शकली नाही, असे कुब्राने सांगितले. कुब्रासारख्या इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांची सार्वजनिक ठिकाणी छेड काढली गेली आहे किंवा काही वेळेस कुठल्यातरी अनोळख्या व्यक्तीने त्यांना चुकीच्या हेतूने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. लैंगिक शोषण होणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दीपिका पादुकोणपासून ते बिपाशा बसुपर्यंतच्या अभिनेत्रींचा समावेश आहे.

कुब्रा सैत
‘सेक्रेड गेम्स’या वेबसिरीजमधून प्रसिद्ध झालेल्या कुब्रा सैतने तिच्यासोबत घडलेल्या लैंगिक शोषणाचा खुलासा केला. कुब्रा १७ वर्षांची असताना एका काकांनी जवळपास अडीच वर्षे तिचे लैंगिक शोषण केल्याचे तिने सांगितले.

सोनम कपूर
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिचं गरोदरपण कुरवाळत आहे. पण सोनम कपूरसोबतसुद्धा लैंगिक शोषणाचा प्रकार घडला होता. सोनम १३ वर्षांची असताना थिएटरमध्ये एका इसमाने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता.

दीपिका पादुकोण
सध्याची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणने एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेल्या लैंगिक शोषणाचा किस्सा सांगितला होता. ती म्हणाली, रस्त्यावर एका अनोळखी व्यक्तीने तिला स्पर्श केला होता, त्यावेळी दीपिकाने भर रस्त्यात त्या व्यक्तीची धुलाई केली होती.

बिपाशा बसू
बॉलिवूडची बंगाली छोरी बिपाशा बासूचा बोल्डनेस अनेकांना घायाळ करत असतो. पडद्यावर रफ अॅण्ड टफ दिसणारी ही अभिनेत्रीसुद्धा लैंगिक शोषणाला बळी पडली होती. बिपाशा जिस्म चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नाइट क्लबमध्ये गेली असताना तिथे असलेल्या एका व्यक्तीने तिची छेड काढली होती.

कल्की कोचीन
लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या अभिनेत्रींच्या यादीत कल्की कोचीनच्या नावाचा सुद्धा सहभाग आहे. कल्की ९ वर्षांची असताना तिच्यासोबत छेडछाडीचा प्रकार घडला असल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले. 

स्वरा भास्कर
अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या बिनधास्त वागण्या-बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण एकदा एअरपोर्टवर एका अनोळखी व्यक्तीने स्वराची छेड काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ती देखील लैंगिक शोषणाला बळी पडल्याचे तिने सांगितले.