कधी भुमिकेची गरज म्हणून तर कधी नवस फेडण्यासाठी ...

कधी भुमिकेची गरज म्हणून तर कधी नवस फेडण्यासाठी टेलिव्हिजनवरील या सुनांनी डोकं भादरवलंय…. (These daughters-in-law of TV have shaved their heads in real life)

काही दिवसांपूर्वी टी.व्ही. वरील अभिनेता सूरज थापर याची पत्नी दीप्ति ध्यानी (Dipti Dhyani)ने स्वतःचे केस तिरुपतीच्या बालाजी मंदिरात दान केल्याची बातमी वाचण्यात आली. सुरज थापरला करोना झाल्यानंतर तो बरा झाल्यावर मी आपले मुंडन करुन घेईन असा नवस तिने बालाजीला केला होता. त्यानुसार दीप्तिने आपले केस दान केले. परंतु दीप्ती ही अशी पहिलीच अभिनेत्री नाही. याआधीही टेलिव्हिजनवरील काही अभिनेत्रींनी एक्सपिरीमेंट म्हणून म्हणा वा इतर काही कारणांसाठी आपल्या केसांचा त्याग केला आहे, अर्थात मुंडन करून घेतले आहे. पाहुयात तर या अभिनेत्री कोण आहेत…

जेनिफर विंगेट (Jennifer Winget)

बेहद या मालिकेच्या एका सीक्वेंससाठी जेनिफर विंगेटने टक्कल केल्याचं दाखवलं होतं. या मालिकेत ती सर्व मायापाश सोडून संतांसोबत राहण्यास जाते असे दाखविण्यात आले होते. मात्र हे मुंडन खरं नव्हतं तर भुमिकेची गरज म्हणून तसा तिला मेकअप करण्यात आला होता.

निया शर्मा (Nia Sharma)

एक हजारों में मेरी बहना है या मालिकेमध्ये निया शर्माने एका कॅन्सर पीड़ित मुलीची भूमिका केली होती. त्या दरम्यान निया शर्माचे आजारामुळे सर्व केस जातात असे दाखविण्यात आले होते. अर्थात तिलाही तसा मेकअप केला होता.

रिंकू करमाकर (Rinku Karmarkar)

टेलिव्हिजनवरील नटी रिंकू करमाकर हिने मात्र ये वादा रहा या मालिकेतील निगेटीव्ह रोलसाठी खरोखर आपल्या केसांचे मुंडन केले होते. हुबेहूब पात्र वठावं याकरिता तिने केसांचा त्याग केला होता.

पूजा कनवाल (Pooja Kanwal)

पूजा कनवाल ही आणखी एक अशी अभिनेत्री आहे जिचं या लिस्टमध्ये नाव आहे. शपथ या मालिकेतील पात्राची गरज म्हणून पुजाने स्वतःच्या केसांचं मुंडन करून घेतलं होतं.

कृतिका देसाई (Krutika Desai)

कृतिका देसाई ही अशी पहिली अभिनेत्री आहे की जिने मालिकेतील कामासाठी डोकं भादरवून घेतलं होतं.

अंजली मुख्ती (Anjali Mukhi)

अंजली मुख्तीने इश्कबाज मालिकेसाठी मुंडन केले होते. या मालिकेमध्ये अंजली मुख्तीने सुरभि चंदनाच्या आईचा रोल केला होता.

पुष्टि शक्ति ( Pushtiie Shakti)

अभिनेत्री पुष्टि शक्तिने नवस फेडण्यासाठी केस दान केले होते.

(सर्व फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)