लग्न न करता वंशवेल वाढविणारे कलाकार : परंपरा मो...

लग्न न करता वंशवेल वाढविणारे कलाकार : परंपरा मोडित काढून सुरु केली नवी प्रथा (These Celebs Started Their Family Without Marriage, Set Example By Breaking Old Traditions)

भारतीय संस्कृतीत कुटुंबव्यवस्थेसाठी लग्नाला खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि लग्नानंतर मूल होत नसेल, तर मूल दत्तक घेणं हीसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या देशात राहणारे बहुतेक लोक भारतीय संस्कृती आणि परंपरांचे पालन करण्यावर विश्वास ठेवतात, परंतु बदलत्या काळात अनेक लोक सनातनी परंपरा मोडून एक नवीन उदाहरण जगासमोर ठेवत आहेत. विशेषतः बॉलिवूडचे असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी लग्नाशी संबंधित रूढी परंपरा मोडीत काढत लोकांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. अशाच काही लोकप्रिय कलाकारांबाबत आपण जाणून घेणार आहोत, ज्यांनी लग्न न करताच आपली वंशवेल वाढविली आहे, अन्‌ परंपरा मोडित काढून नवी प्रथा सुरू केली आहे.

सुष्मिता सेन

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन अजूनही अविवाहित आहे, पण तिने आपला संसार सुरू करण्यासाठी लग्नाची वाट पाहिली नाही. सुष्मिताने २००० साली एका मुलीला दत्तक घेतले, तिचे नाव तिने रिनी ठेवले आणि त्यानंतर २०१० मध्ये तिने दुसरी मुलगी अलिशा हिला दत्तक घेतले. सध्या सुष्मिता लग्नाशिवाय आपल्या दोन्ही मुलींसोबत छोट्याशा कुटुंबात आनंदी आहे.

रवीना टंडन

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

बॉलिवूडची मस्त मस्त गर्ल रवीना टंडनने १९९५ साली वयाच्या २१ व्या वर्षी पूजा आणि छाया नावाच्या दोन अनाथ मुलींना दत्तक घेतले होते. दोन दत्तक मुलींची आई झाल्यानंतर रवीनाने २००४ मध्ये बिझनेसमन अनिल थडानीसोबत लग्न केले. लग्नानंतर रवीनाने एक मुलगी आणि एका मुलाला जन्म दिला. रवीनाच्या दोन्ही दत्तक मुलींचे लग्न झाले आहे आणि आता ती आजी देखील झाली आहे.

प्रीति झिंटा

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रीती झिंटा नुकतीच सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांची आई बनली आहे, पण लग्नाच्या खूप आधी २००९ मध्ये प्रितीने ३४ मुलींना दत्तक घेतले होते, त्या उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील एका अनाथाश्रमात राहतात. दत्तक घेतलेल्या मुलींच्या शिक्षणापासून त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी प्रीती एका आईप्रमाणे उचलते. एवढेच नाही तर ती वर्षातून दोनदा ऋषिकेशला त्यांना भेटायला जाते.

एकता कपूर

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

टीव्हीची क्वीन एकता कपूर अद्याप लग्न करून स्थिरावली नाही, पण तिने लग्नाच्या परंपरेला बगल देत कुटुंब सुरू करून एक नवा आदर्श घालून दिला आहे. २०१९ मध्ये सरोगसीद्वारे ती एका मुलाची आई झाली, ज्याचे नाव रवी ठेवले आहे. एकता तिच्या मुलाची सिंगल मदर आहे आणि ती लग्न न करताच आपल्या मुलासोबत कौटुंबिक जीवनाचा आनंद घेत आहे.

करण जौहर

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

बॉलीवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर अजूनही अविवाहित आहे, परंतु लग्नाशिवाय कुटुंब सुरू करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये त्याचा समावेश आहे. करण जोहर सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांचा सिंगल बाबा बनला आहे. यश आणि रुही अशी त्याच्या मुलांची नावे आहेत.

नीना गुप्ता

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

लग्नाशिवाय संसार सुरू करणाऱ्यांमध्ये अभिनेत्री नीना गुप्ता हिच्या नावाचाही समावेश आहे. वास्तविक, नीना गुप्ता विवियन रिचर्ड्ससोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यांना एक मुलगी आहे आणि तिचे नाव मसाबा गुप्ता आहे. नीनाने सिंगल मदर बनून आपल्या मुलीचे संगोपन केले, त्यानंतर २००८ मध्ये तिने विवेक मेहराशी लग्न केले.