बिग बॉसच्या घरात या कलाकारांनी केला खुलेआम रोमा...

बिग बॉसच्या घरात या कलाकारांनी केला खुलेआम रोमान्स, शो संपल्यावर काहींचा झाला ब्रेकअप तर काहींचा झाला साखरपुडा (These Celebs Romanced in ‘Bigg Boss’ House, After Show Ended, Someone Got Engaged and Someone Broke Up)

सलमान खानच्या वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’मध्ये दिसणारे बहुतेक स्पर्धक प्रसिद्धी आणि पैसा कमवण्यासाठी येतात, पण या शोमध्ये अनेक स्पर्धकांना त्यांचे प्रेमही  मिळाले आहे. मारामारी आणि वादासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘बिग बॉस’मध्येही अशा अनेक जोड्या पाहायला मिळाल्या आहेत, ज्या चर्चेत होत्या. बिग बॉसच्या घरात अनेक स्पर्धकांमध्ये मारामारी झाली. तर काहींनी जोरदार रोमान्सही केला. शो संपल्यानंतर अनेक जोडप्यांचे ब्रेकअप झाले असले तरी काही जोडप्यांचे नाते अजूनही अतूट आहे. बिग बॉसच्या सध्याच्या सीझनमध्ये, सौंदर्या शर्मा आणि गौतम विग यांच्यातील जवळीक खूप चर्चेत आहे.

गौहर खान आणि कुशल टंडन

अभिनेत्री गौहर खान आणि कुशल टंडन ही जोडी एकेकाळी खूप चर्चेत होती. ‘बिग बॉस 7’ मध्ये ही जोडी पाहायला मिळाली होती. या शोदरम्यान दोघांच्या रोमान्सची सर्वत्र चर्चा सुरू झाली होती. मात्र, शोमधून बाहेर आल्यानंतर जेव्हा दोघांच्या लग्नाचा मुद्दा आला तेव्हा त्यांच्या नात्यांमध्ये धर्म आला आणि दोघांचा ब्रेकअप झाला.

पवित्रा पुनिया आणि एजाज खान

बिग बॉस शोमधील आणखी एक प्रसिद्ध जोडी म्हणजे पवित्रा पुनिया आणि एजाज खान. बिग बॉसच्या 14 व्या सीजनमध्ये ही जोडी दिसली होती. शोदरम्यान दोघांमधील जवळीकही वाढली होती. महत्वाची बाब म्हणजे शोमधून बाहेर आल्यावरही त्यांचे नाते टिकून आहे. त्यांनी साखरपुडा केल्याचेही म्हटले जाते.

जस्मीन भसीन आणि अली गोनी

टीव्हीवरील सुंदर अभिनेत्री जस्मीन भसीन आणि अली गोनीही जोडी बिग बॉस 14 मध्ये दिसली होती. सुरुवातीला त्यांनी आपले नाते सर्वांपासून लपवले होते. पण नंतर त्यांनी आपल्या नात्याचा सर्वांसमोर खुलासा केला. अनेकदा ते एकत्रही दिसतात.

राकेश बापट आणि शमिता शेट्टी

राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांच्यातील प्रेम सुंदर ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये फुलायला लागले होते.  शो संपल्यानंतरही दोघांनी एकमेकांना डेट केले आणि आपले नातेही सार्वजनिक केले. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांनाही आवडली आणि चाहत्यांनी प्रेमाने त्यांना ‘शारा’ असे नाव दिले, पण त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि दोघांचे ब्रेकअप झाले.

करिश्मा तन्ना आणि उपेन पटेल

सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर आपल्या कारकिर्दीत खूप नाव कमावले आहे. जेव्हा करिश्मा तन्ना ‘बिग बॉस 8’ ची स्पर्धक बनली तेव्हा उपेन पटेलसोबत तिची जवळीक वाढू लागली. पण शो संपल्यानंतर, करिश्मा तन्नाने आम्ही एकत्र भविष्य घडवू शकत नाही असे म्हणत आपल्या ब्रेकअपबद्दल चाहत्यांना सांगितले.

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची ‘बिग बॉस 15’ मध्ये भेट झाली होती. शोमध्ये तेजस्वीला पाहताच करण तिच्या प्रेमात पडला. शोमध्ये अनेकवेळा त्याने तेजस्वीसमोर आपले मन व्यक्त केले. तेजस्वीही त्या सीझनची विजेती ठरली होती. शो संपल्यानंतरही दोघांमधील नाते कायम आहे. तेजस्वी आणि करण अनेकवेळा एकमेकांसोबत स्पॉट झाले आहेत. दोघेही एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाही.